
श्री संत दामाजी सह. साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ हंगामाकरिता दि. १६ ते दि.३१ डिसेंबर या कालावधीत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रति मे. टन २८०० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता संबंधीत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार संबंधित बँका, पतसंस्था खात्यात वर्ग केला असून हा कारखाना शेतकरी, सभादांच्या विश्वासाला पात्र ठरला असल्याची माहिती चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.
पुढे बोलताना चेअरमन पाटील म्हणाले, या हंगामाकरिता जुन, जुलैमध्ये पाऊस बऱ्यापैकी झाला. परंतू त्यानंतर पाऊस झाला नसल्याने ऊसाची वाढ व्यवस्थित झालेली नाही. ऊस क्षेत्र कमी असुन हेक्टरी टनेजचे प्रमाणही घटलेले आहे. त्यामुळे साखर कारखानदारीमध्ये ऊस गाळपासाठी स्पर्धा निर्माण झालेली दिसत आहे. बरेचसे कारखाने ऊस पुरवठ्या अभावी कमी गाळप करताना दिसत आहेत. बंद होत चालले आहेत.
कारखान्याकडे कोणताही उपप्रकल्प नसताना इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नसताना काटकसरीने इतर खर्चाचे नियोजन करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी संचालक मंडळाने २८०० रुपयांप्रमाणे ऊसबील देण्याचा निर्णय घेतला आहे.
दामाजी कारखान्यावर ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचा विश्वास असलेने कारखान्याचे गाळप पूर्ण क्षमतेने चालू आहे. कार्यक्षेत्रतील सर्व शेतकऱ्यांचे संपुर्ण ऊसाचे गाळप होईपर्यंत कारखान्याचा हंगाम चालू राहणार असून शेतकऱ्यांनी ऊस गळीतास पाठविण्याची घाई न करता तोडणी वाहतुक यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन शिवानंद पाटील यांनी केले आहे.
ऊस उत्पादकांची ऊस बिले संबंधीत शेतकऱ्यांच्या खालीलप्रमाणे बैंक, पतसंस्थेतील खातेवर वर्ग केली असल्याची माहिती कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी दिली. धनश्री पतसंस्था मंगळवेढा बठाण, उच्चेठाण, ब्रम्हपुरी, माचणूर, रहाटेवाडी, तामदर्डी, मुंढेवाडी, धर्मगाव, मल्लेवाडी, ढवळस, घरनिकी, मारापूर, मुढवी, महमदाबाद शे, तांडोर, सिध्दापूर, बोराळे, नंदुर, बालाजीनगर, डोणज, पाठखळ, खुपसंगी, मेटकरवाडी, शिरसी, गोणेवाडी, जुनोनी, नंदेश्वर खडकी, भोसे, हुन्नूर, महमदाबाद हु, रेवेवाडी, लोणार, पडोळकरवाडी, शिरनांदगी, चिक्कलगी, रखे, सिध्दनकेरी, मानेवाडी, कात्राळ, मरवडे, कागष्ट, भालेवाडी, डिकसळ, तळसंगी, येड्राव, जित्ती, फटेवाडी, कर्जाळ, हुलजंती, सोड्डी, शिवनगी, आसबेवाडी, हिवरगाव, देगाव, आंधळगाव, गणेशवाडी, येळगी, सलगर बु, लवंगी, सलगर खु, बावची, मारोळी, निंबोणी, पौट, भाळवणी, जालिहाळ, जित्ती, खवे, जंगलगी तसेच हाराष्ट्र गेटकेन मधील पंढरपूर, जत, मोहोळ, द.सोलापूर, उ. सोलापूर म व संपुर्ण कर्नाटक गेटकेन, जिजामाता पतसंस्था,
मंगळवेढा मंगळवेढा, खोमनाळ, डोंगरगाव, गुंजेगाव, लेंडवे-चिंचाळे, कचरेवाडी, लक्ष्मी दहिवडी, अकोला, शेलेवाडी, रतनचंद शहा बँक, मंगळवेढा सांगोला गेटकेन, धनलक्ष्मी पतसंस्था, अरळी अरळी, दसुर, उब्ज, भैरवनाथ पतसंस्था, कंदलगाव कंदलगाव, अकोला (मंद्रूप) ज्ञानेश्वरी को.ऑ. सोसायटी, मंगळवेढा तसेच शेतकऱ्यांचे मागणीप्रमाणे वैयक्तिक चेक देण्याची व्यवस्था केली आहे. याशिवाय तोडणी वाहतुक बिले-बळीराजा व धनश्री पतसंस्था ठेकेदारांचे मागणीप्रमाणे पाठविण्यात येत आहेत.
व्हा. चेअरमन तानाजी खरात म्हणाले, चालू हंगामात दामाजी कारखान्याने आजअखेर एकूण ७१ दिवसात २,४५,३०५ मे.टन गाळप केले असून एकूण २,४५,९०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले आहे. आजचा साखर उतारा ११.२१% असून आजअखेर साखर उतारा १०.१८% मिळाला आहे. चालू हंगामात गळीतास येत असलेला जास्तीत जास्त ऊस हा ०२६५ जातीचा आहे. आपले सवांचे सहकार्यातून शेतकऱ्यांची ऊस बिले, कामगार पगार, तोडणी वाहतुक ठेकेदारांची बिले वेळेवर देण्याचे काम हे संचालक मंडळ करीत असलेचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द लिगाडे, भिया दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्र. कार्यकारी संचालक रमेश जायभाय, सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते.




