Uncategorized

मंगळवेढ्यात बेकायदा पिस्टल बाळगणे पडले महागात; दोघांना चार दिवसाची पोलिस कोठडी

मंगळवेढ्यात बेकायदा पिस्टल बाळगणे पडले महागात; दोघांना चार दिवसाची पोलिस कोठडी

मंगळवेढा शहरात बेकायदा पिस्टल बाळगल्याप्रकरणी नाना ज्ञानेश्‍वर जगताप(कारखाना रोड) व कृष्णा महेश खटकळे (खंडोबा गल्ली) या दोघांना पोलिसांनी अटक करून मंगळवेढा न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.के. पाटील यांच्यासमोर उभे केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या घटनेची हकिकत अशी,दि.23 रोजी सायंकाळी 5.20 वा. मंगळवेढा शहरातील एम. आय. डी. सी. परिसरात वरील आरोपी बेकायदा पिस्टल घेवून येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा लावून वरील दोघांना पकडून अंग झडती घेतली असता दोन पिस्टल व तीन जीवंत काडतुसे मिळून आली होती. या घटनेत 1 लाख 91 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर घटनेत वरील दोघा आरोपींना तपासिक अंमलदार तथा पोलिस उपनिरिक्षक विजय पिसे यांनी अटक करून मंगळवेढा न्यायालयात उभे करून आरोपींनी पिस्टल कोठून आणले ते कशासाठी आणले,स्वतःसाठी आणले की दुसर्‍यासाठी आणले,जवळ बाळगण्याचा नेमका उद्देश काय? आदी मुद्दे न्यायालयासमोर मांडले असता न्यायालयाने दि.28 मे पर्यंत आरोपीस पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान,मागील वर्षापूर्वीही याच परिसरात बेकायदा पिस्टल बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button