Uncategorized

“गुरूंच्या आशीर्वादाने घडते आयुष्याची वाटचाल!”चौथी मधील विद्यार्थ्यांनी केला शिक्षक दिन साजरा

“५ सप्टेंबरला देशभरात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो”.

मंगळवेढा प्रतिनिधी

मंगळवेढा नगरपालिका मुलांची शाळा नंबर एक शाळेतील मुलांनी शिक्षक दिन साजरा केला.आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आईवडील आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाची सगळ्यांचं आवश्यकता भासते.

दिनांक 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून नगरपालिका शाळेतील चौथीमधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी वर्ग शिक्षक विरेंद्र राक्षे गुरुजींना शिक्षक दिनानिमित हार फुगे,गुलाबाची फुले आणि केक कट करून शुभेच्छा देत शिक्षक दिन साजरा केला.

यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचा आनंद आणखी खास दिसत होता.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात शिक्षकांप्रती प्रेम आणि आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो.त्यामुळे शिक्षक दिन विद्यार्थ्यांना आणखीन खास वाटतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button