मंदिराप्रमाणेच संस्थेचे पावित्र्य राखणेची जबाबदारी या संचालक मंडळाने सांभाळली – ह.भ.प.जयवंत बोधले महाराज
३४ वा गळीत हंगाम शुभारंभ संपन्न ;४ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट

मंगळवेढा प्रतिनिधी
श्री संत दामाजी कारखाना ३४ वा बॉयलर प्रदिपन व गळीत हंगाम शुभारंभ श्री संत दामाजी कारखाना तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला घेवून पुढे जाणारा साखर कारखाना आहे. मंगळवेढयामध्ये संत दामाजीपंतांचे मंदिर असुन त्याचप्रमाणे दामाजी कारखाना ही संस्थाही सभासदाचे मंदिरच आहे.मंदिराप्रमाणेच संस्था सुध्दा पवित्र असते असे मत ह.भ.प.जयवंत बोधले महाराज यांनी दामाजी कारखान्याच्या ३४ व्या बॉयलर अग्निप्रदिपन व गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, या संचालक मंडळाने कारखाना चांगल्या प्रकारे चालविला आहे. सगळयांनी एकत्रित येवून एकरुप होणे गरजेचे असते. संतांची मांदियाळी मंगळवेढा येथे आहे.या संतांच्या भूमीतील हा कारखाना टिकला पाहिजे या उद्देशाने हे संचालक मंडळ चांगले काम करीत आहे असे शेवटी ते म्हणाले.
श्री संत दामाजी साखर कारखान्याचा ३४ वा बाùयलर अग्निप्रदिपन व गळीत हंगाम शुभारंभ रविवार दि.११ आùक्टोबर २०२६ रोजी शारदीय नवरात्रारंभाचे शुभ मुहुर्तावर संपन्न झाला. बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ ह.भ.प.जयवंत बोधले महाराज यांचे हस्ते व गळीत हंगाम शुभारंभ उद्योजक रमेश किसनलाल मर्दा यांचे शुभहस्ते पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शक मा चेअरमन शिवाजीराव काळुंगे, कारखान्याचे मा चेअरमन ॲड नंदकुमार पवार हे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहूल शहा, कारखान्याचे मा व्हा.चेअरमन रामचंद्र वाकडे हे उपस्थित होते. बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमाची होमहवन महापुजा कारखान्याचे संचालक बसवराज रामगोंडा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शितल बसवराज पाटील यांचे शुभहस्ते झाली.गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी श्री सत्यनारायण महापुजा संचालक दिगंबर छगन भाकरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.प्रज्ञा दिगंबर भाकरे या उभयतांचे हस्ते पार पडली.कार्यक्रमाचे सुरवातीला उपस्थितांचे स्वागत प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी केले. तसेच कार्यक्रमाची अध्यक्षीय सुचना संचालक गोपाळ भगरे यांनी मांडली,अनुमोदन संचालक गौडाप्पा बिराजदार यांनी दिले.
सदरचे कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील म्हणाले, या गळीत हंगामासाठी कारखान्याची सर्व प्रकारची कामे पूर्ण झाली आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यामध्ये फक्त ६ लाख मे.टनाची नोंद आहे. ऊस गाळपासाठी या हंगामात स्पर्धा असणार आहे. तरीही संचालक मंडळाने ४ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. या संचालक मंडळाने अत्यंत काटकसरीने कामकाज केले आहे.आर्थिक अडचण असली तरी ऊसाचे राहिलेले बिल देण्यासाठी मार्ग काढून बिल अदा केले जाईल. नियमित कामगारांचे पगाराबरोबर सेवानिवृत्त कामगारांनाही दर महिन्याला ठरलेनुसार रक्कम दिली जात आहे. तसेच या दिपावली सणासाठी १० दिवसाच्या पगाराएवढा बोनस टक्केवारीत दिला जाणार आहे.आजपर्यंत या कारखान्यासाठी मा. आ. प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे मा. चेअरमन भगिरथ भालके यांनी सहकार्य केले आहे.तसेच माजी चेअरमन शिवाजीराव काळुंगे, राहूल शहा, रामकृष्ण नागणे यांनी बँकांच्या माध्यमातून सहकार्य केलेले आहे. आपला ऊस दामाजी कारखान्यास गळीतासाठी देण्याचे आवाहन शेवटी त्यांनी केले.
ॲड श्री नंदकुमार पवार मनोगत व्यक्त करताना म्हणाले,या वर्षी १९७२ सारखीच दुष्काळी परिस्थिती आहे.उपलब्ध ऊस जनावरांच्या चा-यासाठी जात आहे.कारखान्यांना साखर उत्पादन करीत असताना उत्पादन खर्च जास्त आहे. परंतु साखर विक्रीतून कमी रक्कम मिळत आहे. सभासदांना जास्त ऊस दर देणेसाठी सरकारने साखर विक्रीचा दर वाढवून देणे गरजेचे आहे. को-२६५जातीच्या ऊसाचे वजन जास्त येते परंतु साखर उतारा कमी मिळत आहे. स्व.मारवाडी वकील व स्व.रतनचंद शहा शेठजी यांनी लावलेले हे कारखान्याचे रोपटे वटवृक्षामध्ये रुपांतर करण्याचे काम आपण करायचे आहे. काळुंगे सरांनी कारखान्यास आर्थिक मदत केली नसती तर हा कारखाना चालू शकला नसता. या संचालक मंडळाने हा कारखाना चांगल्या रितीने चालविला आहे। राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी मिळून ही संस्था टिकविली पाहिजे असे शेवटी त्यांनी नमूद केले.
श्री रमेश किसनलाल मर्दा आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आजपर्यंत या संचालक मंडळाने चांगले काम करुन कारखाना चांगल्या प्रकारे चालविला आहे. यापुढेही सर्वांनी मिळून कारखाना प्रगतीपथावर आणावा अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे म्हणाले कि, चालू वर्ष हे साखर कारखानदारीसाठी कठिण वर्ष आहे. आजपर्यंत या कारखान्याला कामगारांचे सहकार्य भरपूर मिळालेले आहे. हा कारखाना चांगल्या प्रकारे चालला पाहिजे या हेतूने धनश्री परिवाराने या कारखान्यास आर्थिक मदत केली आहे.सेवानिवृत्त कामगारांची देणी द्यावी लागणार आहेत.त्यासाठी या संचालक मंडळाने चांगला निर्णय घेतला आहे.परंतु सेवानिवृत्त कामगारांनीही सध्याची परिस्थिती पाहून सामोपचाराची भुमिका घेतली पाहिजे.या कारखान्याने ठरविलेले ४ लाख गाळपाचे उद्षि्ठ हा कारखाना निश्चीतचपूर्ण करेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी व्हाईस चेअरमन श्री तानाजीभाऊ खरात, संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, प्रथमेश पाटील, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर यांचेसह देवानंद गुंड-पाटील, कल्याण रोकडे, अभिषेक पाटील, शिवकुमार पाटील, वैभव नरोटे, प्रकाश मर्दा, किशोर मर्दा, डॉ श्रीकांत मर्दा, भारत पाटील, एकनाथ होळकर,संभाजी लवटे, कांतीलाल ताटे, किसन गवळी, राजकुमार पाटील, शिवाजीराव नागणे, अभंगा लेंडवे, युवराज गडदे, लव्हाजी लेंडवे, दिगंबर माळी, शंकर पाटील, रेवण जुंधळे, तायाप्पा गरंडे, अशोक लेंडवे, भारत लेेंडवे, आबा माळी, सत्यवान लेंडवे, सुनिल वेळापुरे, अùड.महादेव गायकवाड, खुदबुद्दीन शेख, फैयाज शेख, दत्तात्रय स्वामी, गोवर्धन पवार, राजेंद्र बेदरे, राजु बाबर, बनसोडे गुरुजी,शंकर पाटील, भिमराव पाटील, काशिनाथ पाटील, महादेव माळी,दिलीप घाडगे, मनोज ठेंगील, दसाडे गुरुजी, मुरलीधर सरकळे, रविंद्र पुजारी, विकास बेदरे, दत्तात्रय बेदरे तसेच शेतकरी-सभासद, ठेकेदार, कारखान्याचे खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी तसेच कामगार संघटना व पतसंस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे शेवटी उपस्थितांचे आभार संचालक श्री रेवणसिध्द् लिगाडे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक उन्हाळे यांनी केले.




