Uncategorized

मंगळवेढ्यातील नवरात्र महोत्सवाचा आज शेवटचा दिवस; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी,तुंबाड महारुद्र कंदरा’, ‘पावनखिंडीचा रणसंग्राम’ ठरले आकर्षण….

मंगळवेढ्यातील नवरात्र महोत्सवाचा आज शेवटचा दिवस; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी,तुंबाड महारुद्र कंदरा’, ‘पावनखिंडीचा रणसंग्राम’ ठरले आकर्षण….

मंगळवेढा प्रतिनिधी

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मंगळवेढा शहरात भक्ती आणि ऐतिहासिक शौर्याचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे. शहरातील आकर्षक देखावे पाहण्यासाठी तसेच बाजार चौकातील थोरल्या आईसाहेवांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून, प्रमुख रस्त्यांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. नवरात्र महोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे

जिल्हासह ग्रामीण भागातूनही भाविक मोठ्या संख्येने मंगळवेढ्‌यात दाखल होत आहेत. सराफ गल्ली येथील नव माहाराष्ट्र तरुण मोडळाने साकारलेला ‘महारुद्र कंदरा’ हा भव्य देखावा भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. बाजार चौकातील जय भवानी तरुण मंडळाच्या वतीने मंश्ळवेढेकरांचे ब्रद्धास्थान असलेल्या बोरल्या आईसाहेवांच्या दर्शनासाठीही भाविकांची गर्दी होत आहे.

पंढरपूर रोडवरील सप्तशृंगी नवरात्र महोत्सव मंडळाने साकारलेला ‘पावनखिंडीचा रणसंग्राम’ हा ऐतिहासिक देखावाही नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याचबरोबर शहरातील माने गररली, कोंडुभैरी गल्ली, होनमाने गल्ली, शनिवार पेठ, सनगर गल्ली, , नागणे गल्ली आणि कारखाना रोड परिसरात नवरात्रोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे.

या देखाव्यांची चर्चा सध्या सोशल मीडियावरही रंगली आहे. ‘गणपती पाहण्यासाठी पुण्या-मुंबईला जावे आणि नवरात्रोत्सव पाहण्यासाठी मंगळवेढवाला नावे,’ ही टॅगलाईन सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे मंगळवेढ्याच्या नवरात्रोत्सवाची चर्चा शहराच्या सीमा ओलांडून इतर भागांतही पोहोचत आहे.

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पोलिसांकडून शहरातील विविध ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीचे नियोजन करण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धार्मिक श्रद्धा, ऐतिहासिक देखावे आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे मंगळवेढ्‌याचा नवरात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही विशेष चर्चेत आला आहे.

पुण्या-मुंबई प्रमाणेच मंगळवेढ्याचे नवरात्र प्रसिद्ध आहे. याठिकाणचे देखाचे पाहण्यासाठी गर्दी होत आहे. जय महाराष्ट्र नवरात्र मंडळाने सादर केलेला प्रतापगडचा रणसंग्राम अर्थात अफजलखानाचा वध हा देखावा गर्दी खेचतोय प्रतापगडचा रणसंग्राम.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button