Uncategorized

दामाजी कारखान्याकडून या कालावधीचे हंगाम अखेरचे ऊसबिल रु.२८५०- प्रमाणे बँकेत जमा ;एफ.आर.पी पेक्षा प्रति टन रुपये जादा दराने बिल अदा-चेअरमन शिवानंद पाटील

एफ.आर.पी पेक्षा प्रति टन रुपये जादा दराने बिल अदा

दामाजी कारखान्याकडून या कालावधीचे हंगाम अखेरचे ऊसबिल रु.२८५०- प्रमाणे बँकेत जमा 

एफ.आर.पी पेक्षा प्रति टन रुपये जादा दराने बिल अदा-चेअरमन शिवानंद पाटील

मंगळवेढा प्रतिनिधी 

 श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ हंगामाकरिता दि.१ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हंगाम अखेर ऊस पुरवठा केलेल्या शेतक-यांना प्रति मे.टन रु.२८५० प्रमाणे संबंधीत शेतकरी यांचे मागणीनुसार त्या त्या बँका/पतसंस्था यांचेकडे वर्ग केली असुन संबंधीत ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याचे शेती विभागाकडुन बिलाचे व्हावचर घेवुन मंगळवार दि.९/०६/२०२६ पासुन बँकेतुन रक्कम घ्यावी असे आवाहन कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी केले आहे.

  सदर प्रसंगी बोलताना म्हणाले कारखान्याकडे कोणताही उपप्रकल्प नसताना, इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नसताना, काटकसरीने इतर खर्चाचे नियोजन करुन ऊस उत्पादक शेतक-यांच्या विश्वासाला पात्र राहणेसाठी कारखान्याची एफआरपी रु.२६८९।६५ असताना संचालक मंडळाने हंगामअखेर गळीतास आलेल्या संपुर्ण ऊसाचे बिल प्र।मे।टन रु.२८५०/- प्रमाणे दिले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कष्टाचा विचार करुन प्र.मे.टन रु।१६०।३५ जादाचे बिल देण्याचे काम या संचालक मंडळाने केले आहे। तसेच तोडणी वाहतुक ठेकेदारांची बीले व कर्मचाÅयांचे वेतन यापुर्वी वेळेवर अदा केलेली आहेत। पुढील गळीत हंगामासाठी आùफ सिझनमधील सर्व प्रकारची कामे वेळेत पूर्ण करण्याचा संचालक मंडळाचा मानस असुन. ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा भरती करणेचे काम चालु आहे. लवकरच त्यांना लेबरभरतीसाठी अùडव्हान्स देणार आहोत। दामाजी कारखान्यावर ऊस उत्पादक सभासद शेतक-यांचा विश्वास असलेने येणाऱ्या हंगामाकरिता कार्यक्षेत्रातील ८२०० हेक्टर ऊसाची नोंद दामाजी कारखान्याकडे झाली आहे. कारखान्याचे व्हा.चेअरमन तानाजीभाऊ खरात, संचालक मंडळ,सर्व सभासद-शेतकरी,ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, कारखान्याचे अधिकरी-कर्मचारी वर्ग यांचे सहकार्याने येणाऱ्या २०२६-२७ हंगामात ५ ते ६ लाख मे.टन ऊस गळीत करुन हंगाम यशस्वी करणार असलेचा विश्वास सदर प्रसंगी त्यांनी व्यक्त केला.

ऊस उत्पादकांची ऊस बिले खालील प्रमाणे बँकेतील खातेवर वर्ग केली असलेची माहिती कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी दिली.

धनश्री पतसंस्था मंगळवेढा – बठाण, उचेठाण, ब्र्म्हपुरी, माचणूर, रहाटेवाडी, तामदर्डी, मुंढेवाडी, धर्मगाव, मल्लेवाडी, शेलेवाडी, ढवळस, घरनिकी, मारापूर, मुढवी, महमदाबाद शे, लक्ष्मी दहिवडी, तांडोर, सिध्दापूर, बोराळे, नंदुर, बालाजीनगर, डोणज, गुंजेगांव, लेंडवे चिंचाळे, पाठखळ, खुपसंगी, मेटकरवाडी, शिरसी,गोणेवाडी, जुनोनी, नंदेश्वर खडकी, भोसे, हुन्नूर, रेवेवाडी, शिरनांदगी, चिक्कलगी, रड्डे, सिध्दनकेरी, मानेवाडी, कात्राळ, मरवडे, कागष्ट, भालेवाडी, डिकसळ, तळसंगी, येड्राव, जित्ती, फटेवाडी, कर्जाळ, हुलजंती, सोड्डी, शिवनगी, आसबेवाडी, हिवरगाव, देगाव, आंधळगाव, गणेशवाडी, येळगी, सलगर बु, लवंगी, बावची, मारोळी, निंबोणी, पौट, भाळवणी, जालिहाळ, जित्ती, खवे, जंगलगी, सलगर खु। तसेच महाराष्ट्र गेटकेन मधील पंढरपूर, जत, मोहोळ, द।सोलापूर, उ।सोलापूर व संपुर्ण कर्नाटक गेटकेन, जिजामाता पतसंस्था,मंगळवेढा – मंगळवेढा, खोमनाळ, डोंगरगाव, कचरेवाडी, अकोला, रतनचंद शहा बँक,मंगळवेढा-सांगोला गेटकेन, धनलक्ष्मी पतसंस्था, अरळी- अरळी,नंदुर,दसुर,उंब्रज।, लक्ष्मी पतसंस्था अरळी- बँकेचे मागणी पत्रानुसार,.भैरवनाथ पतसंस्था, कंदलगाव – कंदलगाव, अकोला, मंद्रूप, ज्ञानेश्वरी को।क्रे।सोसायटी, मंगळवेढा बँकेचे मागणी पत्रानुसार, शंभु महादेवा मल्टीस्टेट को.आùप क्र.सोसा.लि. लोणार-लोणार,पडोळकरवाडी,महमदाबाद हु, तसेच शेतक-यांचे मागणीप्रमाणे वैयक्तिक चेक देण्याची व्यवस्था केली आहे.

 सदर प्रसंगी कारखान्याचे व्हा चेअरमन तानाजी भाऊ खरात, संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, प्रथमेश पाटील, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, कार्यकारी संचालक रमेश जायभाय, यांचेसह कारखान्याचे खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button