Uncategorized

महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी केला प्रचाराचा शुभारंभ; आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी मातेचे घेतले दर्शन

महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी केला प्रचाराचा शुभारंभ;आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी मातेचे घेतले दर्शन

सोलापूर विधान परिषदेसाठी महायुतीकडून राजेंद्र राऊत हे निवडणूक लढवत आहेत आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन सुरुवात केली त्यावेळी माध्यमांशी बोलत होते.

यावेळी मोठे मालक स्व.मा. आमदार सुधाकर पंत परिचारक मालक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचेही आशीर्वाद घेतले यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक आणि उमेश परिचारक यांच्याशी चर्चा करून आशीर्वाद घेतले दरम्यान भाजप पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना उमेदवार राजेंद्र राऊत म्हणाले राजकारणाच्या पलीकडे प्रशांत मालक आणि माझे मैत्रीचे संबंध आहेत. मी गेली तीस वर्षे राजकारणात काम करत आहे त्यामुळे महायुतीमधील मतदान मिळेलच आणि सर्वांशी मैत्रीचे संबंध असल्याने त्यांच्याकडूनही मतदान मिळणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

माझ्यापेक्षा प्रशांत मालकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुने संबंध आहेत. पक्षातील एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून उमेदवारी मिळाली असल्याने विजय हा निश्चित असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button