मंगळवेढा पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.!

मंगळवेढा प्रतिनिधी
मंळवेढा पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी 7 वाजून 30 मीनीटांनी पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी डाॅ तानाजी भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
यादिवशी राज्यघटनेच्या अंमलबजावणीला 75 वर्षे पूर्ण होत.सर्वत्र साफ सफाई करून पाण्याचा सडा मारून आकर्षक रांगोळी काढली व त्यावर फुलांची मोठी सजावट केली होती.
यावेळी तालुक्यातील ग्रामीण भागातील दवाखान्याचे अधिकारी, कर्मचारी व खाजगी डाॅक्टर उपस्थित होते.
यावेळी डाॅ.खटकाळे,डाॅ जाधव डाॅ कोळी डाॅ मुजावर डाॅ माळी डाॅ गडहिरे ,संदिप लिगाडे परिचर विजय कुंभार,गजानन तपेले ,अरून खंदारे व खाजगी सेवा दाता रोहित ढावरे ,ओम भिमदे रोहन हेंबाडे ,बिरूदेव व्हरे आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.यानंतर मिठाई वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




