पंढरपूर मंगळवेढा बायपास रोडवर दोन कंटेनर आयशर टेंम्पोंचा अपघात ,एक टेम्पो कॅनाॅल मध्ये पडला!

मंगळवेढा प्रतिनिधी
पंढरपूर मंगळवेढा बायपास रोडवर बारा चाकी दोन कंटेनर आयशर टेम्पोचा अपघात झाला अपघातामध्ये दोन्ही आयशर टेम्पोंचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी एमएच 46 बीम 8719 हा कंटेनर दामाजी कारखाना बायपास रोडवर टर्न घेतना स्टेरींग लाॅक होऊन शेतात पलटी झाला यामधे मोठे नुकसान झाले आहे. एमएच टीन 88 एवाय 0959 या कंटेनरचे स्टेरींग लाॅक झाल्यामुळे पलटी होऊन एमआयडीसी जववळील कॅनाॅल मध्ये पडला आहे सध्या कॅनाॅल ला पाणी आले असून कंटेनर पडला त्या वरून लाईटच्या तारा मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे कंटेनर काढणे अवघड आहे.
कंटेनर मधील दोन्ही ड्रायव्हर यांनी स्टेरींग लाॅक झाल्याचे कारण सांगीतले असले तरी भविष्यात मोठे अपघात होऊ शकतात यामुळे आयशर मालकांनी वाहनांची वेळीच देखभाल करणे गरजेचे असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
या अपघातामधे दोन्ही कंटेनर मधील मालाचे नुकसान होऊन ड्रायव्हर किरकोळ जखमी झाले आहेत.दिवसें दिवस शहरात व बायपास रोडवर मोठ्या वाहनांची वाहतूक वाढल्यामुळे दररोज मोठे अपघात घडत आहेत.




