
मंगळवेढ्यात बँक ऑफ इंडिया बँकेच्या शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा !

बँक ऑफ इंडिया या मंगळवेढा शाखेचा 54 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील, शिवपार्वतीची मालक दादा घाडगे, महालक्ष्मी ज्वेलर्सचे मालक अर्जुन नागणे यांच्या शुभ हस्ते व सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी मनोगतात चेअरमन पाटील म्हणाले की,बँकिंग क्षेत्राचे महत्त्व आणी बँकिंग क्षेत्र हा प्रत्येक देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. कर्ज,पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो.भारतातील बँकिंग क्षेत्राचे महत्त्व, संपत्तीचे रक्षण करणे आणि व्यक्तींना पतपुरवठा करणे.कोणत्याही देशाच्या विकासात आणि विस्तारात बँकिंग क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असते.
बँका अनेक गोष्टी करत असल्या तरी, त्यांची प्राथमिक भूमिका म्हणजे ज्यांना पैसे आहेत त्यांच्याकडून निधी-ज्याला ठेवी म्हणतात—घेणे, त्यांना एकत्र करणे आणि ज्यांना निधीची गरज आहे त्यांना कर्ज देणे. बँका ठेवीदार (जे बँकेला पैसे देतात) आणि कर्जदार (ज्यांना बँक कर्ज देते) यांच्यातील मध्यस्थ असतात.
एकूणच बँक ऑफ इंडियाची मॅनेजर वेंकटेश आणि त्यांचा पूर्ण स्टाफ बँक ग्राहकांना चांगल्या प्रकारे सेवा देत, योग्य व्यक्तींना चांगल्या प्रकारे मदत देत काम करत आहेत या भावना व्यक्त केली.
यावेळी बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर व्यंकटेश,जयदेव सर व सचिन लेंडवे यांच्यासह पूर्ण स्टाफ उपस्थित होता.




