
संदिप लिगाडे
आंबे चिंचोली ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हा कानमंत्र घेऊन,असे सुसंस्कारित विद्यार्थी जर समाजात तयार झाले तर खऱ्या अर्थाने स्वर्गीय कदम गुरुजींचे स्वप्नपूर्ती होईल असे उद्गार प्रसिद्ध व्याख्याते प्रा. शिवाजी बंडगर सर यांनी व्यक्त केले.ते इंग्लिश स्कूल आंबे चिंचोली च्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते.
ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले नाही त्यांनी नाराज न होता इतरापेक्षा वेगळे काहीतरी करावं व विद्यार्थी आदर्श कसा असावा याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली या वयात विद्यार्थ्यांनी धडपडले पाहिजे हे हार्मोन्स बदलणारे वय असते असाही त्यांनी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे खजिनदार रामचंद्र नेहरवे, केंद्रप्रमुख विजय गंगाने, सरपंच सौ आरती जाधव, समाजसेवक भारत आतकरे ,मुख्याध्यापक सुभाष बाबर आदी उपस्थित होते.
संस्थेचे खजिनदार रामचंद्र नेहरवे म्हणाले की ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने सुरू केलेल्या शाखांचे मोठ्या वटवृक्षात रुपांतर व्हावे विद्यार्थ्यांना व्यवसाय भिमुख शिक्षण मिळण्यासाठी त्यांना शिक्षणाची दारे खुली करून योग्य वयात योग्य शिक्षण मिळावे ही अपेक्षा व्यक्त केली. व् प्रास्ताविक सवणे सर यांनी केले सूत्रसंचालन वैष्णव कदम व जयश्री पालसांडे मॅडम यांनी तर आभार श्री वैभव गोडाळे सर यांनी मांडले.





