
मंगळवेढा प्रतिनिधी
देशात लोकसभा निवडणुकीची सध्या वारे जोरात वाहत आहे सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि सोलापूर या दोन लोकसभा निवडणुकीचा प्रचार दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाने शिगेला पोहोचला आहे.
दोनच दिवसापूर्वी सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांनी सोलापूर मध्ये सभा घेऊन मतदारांमध्ये जनजागृती केली त्यांच्याविरोधात असलेले महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे.
प्रणिती शिंदे यांच्या पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात प्रचार सभा सुरू आहेत चार दिवसांपूर्वी विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी तीन माजी मंत्र्यांच्या उपस्थित कासेगाव येथे सभा घेऊन मोठे शक्तीप्रदर्शन केले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
तर दुसरीकडे विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी प्रणिती शिंदे यांची प्रचार सभा आज शुक्रवारी सायंकाळी सहा वा. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व मा. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत सभेचे मोठे आयोजन केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निमीत्ताने विठ्ठल परिवारातील दोन्ही आजी माजी नेत्यांनी आपली प्रतीष्ठा पणाला लावल्याचे दिसत असले तरी आगामी 2024 मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार का? असे मतदारांमधून बोलले जात आहे.




