गुन्हे

“अतिशय क्रुर ! दहा दिवसाची सुट्टी संपवून कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांवर कोयत्याने हल्ला 16 वार केल्याने जागेवरच मृत्यू,एक वर्षाचा मुलगा पोरका झाला…

बारामती : वीजबिल जास्त का आले म्हणून जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका विकृत तरुणाने महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 34 वर्षीय महिला वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील मोरगाव इथं ही घटना घडली आहे. मुळच्या लातूर शहरातील रहिवाशी असलेल्या रिंकू गोविंदराव बनसोडे या दहा वर्षापासून महावितरणमध्ये काम करत होत्या. गेल्या दहा वर्षापासून त्या मोरगाव येथेच कार्यरत होत्या. नोकरीनंतर रिंकू बनसोडे यांचा विवाह झाला. त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. 10 दिवसांची सुट्टी उपभोगून त्या आज मोरगाव कार्यालयात कामावर रुजू झाल्या होत्या.

बुधवारी सकाळी 11.15 च्या सुमारास त्या एकट्याच कार्यालयात होत्या. त्याच वेळी आरोपी अभिजीत पोटे हा तिथे आला आणि त्याने रिंकू यांना बील जास्त आल्याचा जाब विचारला आणि काही कळायच्या आत हल्ला केला. जवळपास त्याने 16 वार रिंकू यांच्या हातापायावर आणि तोंडावर केले. काही कळायच्या आतच रिंकू रक्ताच्या थारोळ्यात पडल्या.

मोरगाव इथं प्रथमोपचार केल्यावर त्यांना तातडीने पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. परंतु, दुर्दैवाने उपचारा दरम्यान त्यांचे दुपारी 3 वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालवली. रिंकू बनसोडे यांच्या मृत्यूने महावितरणमधील कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. या घटनेचा कर्मचाऱ्यांसह सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे.

ज्याने हल्ला केला त्या आरोपीचं वीज बिल रत्नाबाई सोपान पोटे या नावाने आहे. त्या वीजबिलाचा ग्राहक क्रमांक 186640053549 असा असून, चालू एप्रिल 2024 या महिन्याचे 63 युनिट वीज वापराचे वीजबिल 570 रुपये इतके आहे. मागील 12 महिन्याचा वापर तपासला असता तो 40 ते 70 युनीटमध्ये आहे.

थकबाकी नाही. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे चालू महिन्यात वापर 30 युनीटने वाढला आणि त्याचे बील 570 आले होते. हे बील वापरानुसार व नवीन दरानुसार योग्यच असल्याचं महावितरणकडून सांगण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button