गुन्हेसोलापूर जिल्हा

“किती उद्धटपणा! निवडणूक कर्तव्यात नोटीस देऊनसुद्धा हजर नाही निवडणूक निर्णय अधिका-यांनी दिले तातडीने आदेश, सोलापूर जिल्ह्यातील घटना

सोलापूर : माढा लोकसभा निवडणुकीत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पाटबंधारे प्रकल्पातील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांनी दिली.

४३ माढा लोकसभा मतदारसंघांतर्गत २५४ माळशिरस अ.जा. विधानसभा मतदारसंघाच्या सर्व शासकीय कार्यालयातील वाहने व वाहन चालकांची सेवा निवडणुकीच्या कामकाजात वर्ग करण्यात आली आहे.

परंतु उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे प्रकल्प अन्वेशन उपविभाग क्र. ४ माचणूर, मुख्यालय माळशिरस या कार्यालयाकडील वाहन चालक हे निवडणूक कर्तव्यात गैरहजर राहिल्याने निवडणूक कामी अडथळा निर्माण केला.

शासनाचे वाहन चालकाविना उभे राहून खाजगी वाहने भाड्याने घ्यावी लागत होता. संबंधित वाहन चालक यांना कारणे दाखवा नोटीस देऊन हजर होण्यासाठी सांगण्यात आले. त्यानंतरही कर्मचारी हजर झाला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button