सोलापूर जिल्हा

“अतिशय दुःखद व धक्कादायक बातमी सोलापूर चे नेते माजी महापौर महेश अण्णा कोठे यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन

 

सोलापूर – अत्यंत दुःखद व धक्कादायक बातमी सोलापूर चे नेते महेश अण्णा कोठे यांचे हृदयविकाराचा झटका आल्याने प्रयागराज येथे दुःखद निधन झाले आहे. 

अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर सोलापुरातील एक मोठं राजकीय प्रस्थ असलेले महेश कोठे यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली असून अतिशय धक्कादायक एक्झिट मानली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश कोठे हे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते, त्या नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले त्यानंतर थंडी मुळे रक्त गोठले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.महेश कोठे यांची अचानक अकाली निधनाने सोलापूर जिल्ह्यात शोक व्यक्त केला जात आहे.

नुकत्याच विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली होती. महापालिकेमध्ये महेश कोठे यांच्या नावाचा मोठा दबदबा होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button