अति घाई ! आई वडिलांनी चे दुर्लक्ष झाले क्षणातच होत्याचे नव्हते झाले, खेळत खेळत दोन वर्षीय वेदांत चा पिकअप च्या चाकाखाली सापडून मृत्यू

सहकार टाईम्स वृत्त
सांगोला तालुक्यातील कमलापूर येथे पिकअपच्या चाकाखाली सापडून एका दोन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वेदांत विलास काळे (वय २ वर्षे, रा. कमलापूर, ता. सांगोला) असे मृत बालकांचे नाव आहे. याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आवताडे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
पिकअप चालक आणि विलास काळे यांची घरे जवळजवळ असून चालक हा पिकअप नेहमीप्रमाणे ठरलेल्या जागी उभा करीत होता. रविवार २३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या पॅकिंगचे काम असल्याने चालकाने पिकअपमध्ये डिझेल भरून नेहमीच्या ठिकाणी उभा करून जेवणाचा डबा आणण्यासाठी घरी गेला होता.
दरम्यान, मृत बालक वेदांत हा खेळत खेळत पिकअप खाली गेला. त्याचवेळी चालक जेवणाचा डबा घेऊन पिकअप चालू करून जात असताना वेदांत हा पिकअपच्या चाकाखाली सापडल्याने तो गंभीर जखमी झाला.
रामदास काळे यांनी त्यास उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून तो उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे सांगितले.




