खळबळ ! शिरसी येथील हॅटसन दुध डेअरीतील 3 लाख 15 हजार रुपये किमतीच्या दुधाची फसवणूक,केल्याप्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल

खळबळ ! शिरसी येथील हॅटसन दुध डेअरीतील 3 लाख 15 हजार रुपये किमतीच्या दुधाची फसवणूक,केल्याप्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल
शिरसी ता.मंगळवेढा येथील हटसन अॅग्रो प्रोडक्ट लि.कंपनीत संगनमत करून दुध खाली केल्याचे दाखवून तसेच रजिस्टरमध्ये व काटयामध्ये नोंद करून कंपनीची 3 लाख 15 हजार रुपये किंमतीच्या दुधाची फसवणूक केल्याप्रकरणी गणेश रघुनाथ वानखेडे (वय 37,र.मलकापूर,बुलढाणा), अमित दत्तात्रय ,खडतरे (वय 28 रा.नंदेश्वर),सुनिल पांडुरंग कांबळे (वय 29,रा.गोणेवाडी),सचिन मधुकर लेंडवे या चौघाविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, पोलिसांनी तात्काळ तीघा आरोपींना अटक केली असून एकजण फरार असल्याने त्याचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,शिरसी परिसरात चेन्नईची हटसन अॅग्रो ही दुधाची कंपनी आहे. वरील आरोपींनी टँकर क्रमांक एम एच 11,बी.डी.5552 मधून दि.22 जानेवारी ते 23 जानेवारी पहाटेच्या दरम्यान,दुध भरून आणलेले असताना संगनमत करून केवळ 9960 लि.दुध खाली केले. मात्र दुसर्या कप्प्यातील 9 हजार लि.दुध 3 लाख 15 पंधरा हजार रुपये किमतीचे दुध खाली न करता खाली केल्याचे भासवून कंपनीची फसवणूक केली असल्याची फिर्याद डेप्युटी मॅनेजर प्रताप गजानन साळुंखे यांनी पोलिसात दिली आहे.
याचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक विनोद लातूरकर यांनी पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी,डी.वाय.एस.पी.विक्रांत गायकवाड,पोलिस निरिक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली करून तात्काळ चौघापैकी तीघांना दि.17 फेब्रुवारी रोजी अटक केली आहे.दरम्यान,सचिन मधूकर लेंडवे हा आरोपी फरार असून लवकरच त्यालाही गजाआड करण्यासाठी तपास अधिकारी युध्द पातळीवर करीत असल्याचे सांगण्यात आले.
तीघा आरोपींना मंगळवेढा न्यायालयात उभे केले असता दि.21 फेब्रुवारीपर्यत पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली होती.कोठडीची मुदत संपताच पुन्हा न्यायालयात उभे केले असता 14 दिवसाची न्यायालयीनी कोठडी सुनावली आहे.दरम्यान या घटनेत आणखी काही व्यक्ती यामध्ये सामील असण्याची शक्यता वर्तविली जात असून त्या दिशेने तपासिक अंमलदार कसून तपास करीत आहेत.

