मंगळवेढ्यात रायफल ची च चर्चा! बर्थ डे आहे बैलाचा ;मालकाने केक कापून केला वाढदिवस…

मंगळवेढा : आपण आजपर्यत अनेक वाढदिवस केल्याचे पाहिले होते पण मंगळवेढ्यात चक्क लाडक्या शर्यती मधिल बैलाचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा केला.

रायफल हा रूतु भगत यांच्यासाठी बैल नसून तो जिवाभावाचा मित्रच आहे.त्यामुळेच त्यांनी रायफल बैलाचा पहिला वाढदिवस अतिशय उत्साहात आणि अनोळखी जीवांशी मैत्री करून देणारा खेळ बैलगाडा शर्यत शब्दश: थाटामाटात साजरा केला.मंगळवेढ्यात घरा शेजारी असणाय-या अंगणात मोठा मंडप, डिजीटल बँनर आदींनी सजविलेल्या मंडपात हा वाढदिवस सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजन रायफल ग्रुपने केले होते.

यावेळी अनेक तरुणांनी आवर्जून हजेरी लावत वाजत गाजत आनंद साजरा केला.यावेळी शेतकरी कुटुंबामार्फत या रायफल बैलाचे औक्षण करून केक कापण्यात आला.यावेळी रायफल बैलास केक खाऊ घालीत ‘हॅपी बर्थ डे रायफल’ अशा शुभेच्छा उपस्थित शेतकऱ्यांसह युवा तरुणांनी दिल्यात. फटाक्यांच्या आतषबाजीने वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच यावेळी वाढदिवसानिमित्त खमंग भोजनाचा बेतही होता.

मंगळवेढा येथील भगत बागायतदार शेतकरी कुटुंब आहे.त्यांच्याकडे बैलजोडी, गायी, म्हशी अशी जनावरे आहेत या मित्राचा वाढदिवस साजरा करण्याचा आगळा वेगळा आनंद वाटत असल्याचे भगत यांनी सांगितले आहे.




