मंगळवेढासामाजिक

दुर्दैवी घटना! पोहण्यास गेलेल्या १९ वर्षीय तरुण युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू;मंगळवेढा शहरातील घटना

मंगळवेढा शहरात पोहण्यास गेलेल्या एका १९ वर्षीय तरुण मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून अरशद अन्सर सुतार (रा. खंडोबा गल्ली) असे मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. दरम्यान या घटनेची मंगळवेढा पोलीसात नोंद झाली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत अरशद अन्सर सुतार (वय १९) हा दि.१२ मे रोजी दुपारी ३ वाजता घरी कुटूंबियास मित्रासह पोहायला शिकण्यासाठी जातो असे सांगून तो घराबाहेर पडला. यातील खबर देणारे जुबेर सुतार हे दुपारी घरी झोपले असता मयताचा मित्र उज्वल कोळी याचा मोबाईलवरुन फोन आला. अरशद व मी पोहण्यासाठी आवताडे विहीर कचरेवाडी येथे आलो आहे.

मयत अरशद याने पोहण्यासाठी विहीरीत उडी टाकून पाण्यात गेला असता तो बाहेर आलाच नाही तु लवकर ये असा फोन केल्याने मयताचा भाऊ हे घटनास्थळी दाखल झाले. पाण्यामध्ये काही दिसून न आल्याने त्याने अग्निशामक दल बोलावून त्यांच्या मदतीने अरशद याला बाहेर काढून ग्रामीण रुग्गणालयात उपचारासाठी दाखल केल्यावर तेथील डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे घोषीत केले असल्याचे दिलेल्या खबर मध्ये म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button