महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट! पराभवानंतर शिवराज राक्षेंनी पंचाला मारली लाथ;पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड आमनेसामने

अहिल्यानगरीतील महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागले आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गादी विभागातून नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपान्त्य फेरीसाठी सामना रंगला असताना पंचानी दिलेला निर्णय पसंत न पडल्याने शिवराज राक्षे यांनी पंचाला लाथ मारल्याने गोंधळ उडाला आहे. शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली आणि त्यांची कॉलर देखील पकडल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे.
अंतिम सामन्यात पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड आमनेसामने आले होते. सलग दुसऱ्या वर्षी महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला होता. अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ हा महेंद्र गायकवाडवर भारी पडला आणि सामना जिंकला.
नांदेड डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अहिल्यानगरात सायंकाळी सात वाजता हा उपांत्य फेरीचा सामना सुरु झाला होता. त्यावेळी शिवराज राक्षे याला पराभूत झाल्याचे जाहीर केल्यानंतर पराभूत कुस्तीपटू शिवराज राक्षे संतापला आणि त्याने थेट पंचांनाच लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवराज राक्षे याने नंतर पंचाची कॉलर देखील पकडल्याने पोलिसांना हस्तक्षेप करीत हे भांडण सोडवावे लागेले आहे.
शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सेमीफायनल मॅच सुरु होती. यांच्यातील विजेता अंतिम फायनलसाठी निवडला जाणार होता. ही कुस्ती मॅटवर होणार होती. सोलापूरचा महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीचा साकेत यादव यांच्यात झालेल्या सेमी फायनलमध्ये महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला आहे. सलग दुसऱ्या वर्षी महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला आहे. आता महेंद्र गायकवाड आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्या अंतिम लढत होणार आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी नेते उपस्थित होते.



