“लक्ष्मी दहिवडी : अपूर्ण विकास कामे पूर्ण करण्यासाठी मतदार एकवेळ संधी देतील – कोमल ताई ढोबळे!
“स्थानिक उमेदवार असताना आयात उमेदवार दिला का?
मंगळवेढा प्रतिनिधी
लक्ष्मी दहिवडी गटातील राहिलेली अपूर्ण विकास कामे पूर्ण करण्यासाठी कुणाच्याही दबावाला बळी न पडता मतदान रुपी आशीर्वाद देऊन एकवेळ संधी द्या अशी ग्वाही लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटातील उमेदवार कोमल ताई ढोबळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
बोलताना कोमल ढोबळे म्हणाल्या या भागात फिरत असताना गावातील रस्ते पाणी आरोग्य विषय शाळा असे अनेक प्रश्न अपुरेच आहेत 19 गावांमधील काही गावांना पाणी मिळते तर काही गावांना रस्तेच नाहीत , शेतीला रात्रीची लाईट असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत विकास कामांसाठी आलेला निधी मतदान न झाल्यामुळे काढून घेण्यात आला?
३५ गाव उपसा सिंचन योजनेला स्वर्गीय आमदार भारत भालके यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले परंतु विरोधकांनी आपल्या सोयीनुसार या योजनेचा वापर केला ? वाड्या वस्त्यांवर जाऊन नागरिकांशी भेटून थोर मोठ्यांचे आशीर्वाद घेत आहेत. सुरुवातीला अवघड वाटणारी निवडणूक आता सोपी झाल्याचे बोलले जात आहे.
या भागातील स्थानिक उमेदवार न देता आयात उमेदवार दिला निवडणूक आपलीच आहे समजून मतदारांनीच हातात घेतल्याचे सांगितले. माझ्या वडिलांही अनेक विकासाची कामं केली यापुढे त्यांच्या पेक्षाही अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.