राजकारणसोलापूर जिल्हा

“मोठी बातमी !”भगीरथ भालकेंना शब्द?! भगीरथ भालकेंचा मोहिते पाटलांना पाठिंबा,विधासभेला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात भालकेंची ताकद वाढणार

संदिप लिगाडे

 

पंढरपूर माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचे बंधू शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी पंढरपूर येथे माजी चेअरमन भगीरथ भालके यांची सदिच्छा भेट घेतली.

भगीरथ भालकेंनी मतदार संघातील अनेक विषयावर चर्चा करून माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर केला तसेच तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून धैर्यशिल भैय्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

पंढरपूर तालुक्यातील माढा लोकसभेला काही गावी जोडलेली आहेत या गावात भालके गट सक्रिय असून याचा फायदा मोहिते पाटील उमेदवाराला होऊ शकतो तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करतो अशी चर्चा झाल्याचे माहिती समोर येत आहे.यामुळे महाविकास आघाडीला मोठा फायदा होणार आहे आगामी काळात पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मोहिते पाटल समर्थक भरपूर असून भालके गटाचीही ताकद आणखी वाढणार आहे.

यावेळी आजी माजी सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button