मोठ्या घडामोडी! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अध्यक्ष अभिजित पाटीलांनी घेतली भेट,भेटीनंतर पाटील यांची प्रतिक्रीया कारखान्यासाठी…
संदिप लिगाडे

सोलापूर :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठी घटना घडली असून, ती पवारांना धक्का देणारी आहे. राज्य सहकारी बॅंकेच्या कारवाईमुळे आर्थिक कचाट्यात अडकलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी आज सकाळीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
भेटीनंतर अभिजीत पाटील यांनी एका माध्यमांशी बोलताना सांगितले की हा कारखाना शेतकऱ्यांचा असून कारखाना चालला पाहिजे या दृष्टिकोनाने मदतीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतल्यानंतर पाटील म्हणाले लोकसभेला तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला कारखान्यास मदत करतो अशी चर्चा झाली असल्याचे सांगितले निवडणुका या दर पाच वर्षानंतर येत जात असतात परंतू कारखाना हा माझा महत्त्वाचा आहे.
कारखान्यासाठी म्हणेल ती किंमत मोजण्यासाठी तयार आहोत त्यामुळे कारखाना बंद पडू नये ही माझी भूमिका असून सर्व सभासद व संचालक मंडळ एकत्रित बसून सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
भाजप प्रवेश करणार का?
“असे काही ठरले नाही अंतिम निर्णय सर्व सभासद व संचालक मंडळ बसून ठरवून घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले




