कार्यकर्त्यांनो चार दिवस थांबा जरा जे आपल्या मनात आहे तोच निर्णय घेऊ -माजी आ प्रशांत परिचारक

कार्यकर्त्यांनो चार दिवस थांबा जरा जे आपल्या मनात आहे तोच निर्णय घेऊ -माजी आ प्रशांत परिचारक
मंगळवेढा संदिप लिगाडे
कार्यकर्त्यांनो नक्कीच येत्या काही दिवसांमध्ये जे आपल्या मनात आहे, तोच निर्णय घेणे भाग पडणार आहे.कार्यकत्यांच्या जीवावर आपण राजकारण करत असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन चार दिवस थांबा त्यानंतर भूमिका जाहीर करू, असे प्रतिपादन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी जालिहाळ (ता. मंगळवेढा) येथे केले.
जालिहाळ (ता. मंगळवेढा) येथे विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आप्पासाहेब सोलनकर (कर संकलन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका), अंकुश निळे (तलाठी- नाशिक), सुनील पाटील (शिक्षक – सांगली), संजय डोरले (शिक्षक-माळशिरस), रवींद्र पाटील (आदर्श शिक्षक), म्हाकु बरकडे (मुख्याध्यापकपदी निवड), राहुल कांबळे, अभिजीत लाड (आदर्श ग्रामसेवक), नवनाथ चौगुले (गुणवंत वायरमन) या सर्व गुणवंतांचा व पुरस्कार मिळालेल्यांचा माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी परिचारक म्हणाले की, कोणत्याही प्रकारचे आर्थिक सोर्स नाहीत, केवळ इच्छाशक्तीच्या बळावरती वारंवार आपल्या हाती घेतलेल्या विकास कामाला पाठपुरावा करीत, गावामध्ये तीन कोटींची विकास कामे करून सचिन चौगुले यांनी जालिहाळ गावाला नवे वैभव प्राप्त करून दिल्याचे सांगितले.
यावेळी सरपंच सचिन चौगुले यांनी परिचारक यांनी विधानसभा लढवावी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची तुतारी हाती घेऊन निवडणूक लढविल्यास नक्की विजयी व्हाल, या मागणीवर परिचारक यांनी उत्साहित असलेल्या कार्यकत्यांना थोडं थांबा, असे सांगत सूचक इशारा दिला.
यावेळी व्यासपीठावर दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हाईस चेअरमन तानाजी खरात, औदुंबर वाडदेकर, काशीनाथ पाटील, अजित जगताप, गौरीशंकर बुरकुल, राजेंद्र पाटील, महादेव लुगडे, सुरेश कोळेकर, तानाजी कांबळे, नामदेव जानकर, अशोक माळी, विजय बुरकुल, पप्पू स्वामी, कन्हय्या हजारे, बबलू सुतार, भागवत भुसे, नितीन घुले, माधवानंद आकळे, जालिहाळचे सरपंच सचिन चौगुले, उपसरपंच भीमराव कोरे उपस्थित होते.




