महाराष्ट्रमाळशिरस

अकलूज येथे महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार सोहळा ! लोकसभेप्रमाणे विधानसभेचीही रणनीती अकलूजमध्येच ठरणार; मातब्बर नेते येणार एकत्र!

अकलूज येथे महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार सोहळा ! लोकसभेप्रमाणे विधानसभेचीही रणनीती अकलूजमध्येच ठरणार; मातब्बर नेते येणार एकत्र!

संदिप लिगाडे

अकलूज येथे आज रविवार रोजी देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त विशेष सन्मान व राज्यातील सर्वच नवनिर्वाचित खासदाराच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते हा सन्मान होणार असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आ. जयंत पाटील यांचेसह राज्यातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील स्टेडियमवर सुमारे पन्नास हजार नागरिकांच्या बैठकीची व्यवस्था व्हावी यासाठी भव्य मंडप उभारण्याचे काम सुरु आहे. या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा व माढा मतदार संघातील सुमारे पन्नास हजार लोक उपस्थित राहतील असेही संयोजक समीतीच्या वतीने सांगण्यात आले. या कार्यक्रमास सर्वच राजकीय पक्षाचे नेते उपस्थितीत राहणार असून हा कार्यक्रम पक्ष विरहित असल्याचे खा. धैर्यशील यांनी अवर्जुन सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button