जयश्री मानेंचा विरोधकांना थेट सवाल !हुलजंती गटातील मूलभूत प्रश्नांवर आरोग्य, शिक्षण, वीज, रस्ते, पाणी योजना राबवल्या नाहीत – जयश्री माने
मंगळवेढा प्रतिनिधी
हुलजंती जिल्हा परिषद गटातील नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्त्यांची चार वर्षांपासून दुरवस्था झाली असून दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. दिवसा वीजपुरवठा मिळत नसल्याने शेती, उद्योग आणि दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. शिक्षण व्यवस्था ढासळली असून शाळांमधील रिक्त जागा भरण्यास सरकारकडून अनास्था दिसून येत आहे.
पिण्याच्या पाण्याच्या योजना वारंवार बंद पडत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असा घणाघाती आरोप हुलजंती जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार जयश्री माने यांनी केला.भाळवणी येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
माने म्हणाल्या की, दौलत माने यांच्या सातत्यपूर्ण संपर्कामुळे त्यांनी जनतेच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. स्व. भारत नाना यांचे कार्य नेहमीच जनहिताचे होते.मात्र काहींची गद्दारी जनतेला मान्य नाही. अशा प्रवृत्तीला यावेळी मतपेटीतून योग्य उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. आरोग्य, शिक्षण, वीज, रस्ते, घरकुल, पाणी आणि शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून हुलजंती गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून संधी द्या, असे आवाहन जयश्री माने यांनी केले.
यावेळी मरवडे पंचायत समिती उमेदवार उन्नती पवार, महेश माने, सरपंच लक्ष्मण गायकवाड, माऊली भंडगे, तानाजी आवळेकर, युवराज शिंदे, श्रीरंग माने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.