“लक्ष्मी दहिवडी गटात कोमल ताई ढोबळे यांची प्रचारात आघाडी, मतदारांची पसंती स्थानिक उमेदवाराला?!
मंगळवेढा प्रतिनिधी
संपूर्ण राज्यात प्रचाराचा धुराळा उडाला असून सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यात दोन्ही बाजूंनी अनेक आरोप प्रत्यारोपानी राजकारण ढवळून निघाले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटामध्ये विकासाची गंगा प्रत्येकाच्या वाड्यावस्त्यांवर पोहचवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असते तीच जबाबदारी पार पाडण्यासाठी लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटातून कोमलताई ढोबळे या निवडणुकीच्या सामोरे जात आहेत त्यांनी गटातील प्रत्येक घरात वाड्या वस्त्यांवर भेटी देत मतदारांच्या संपर्कात आहेत.
तरुण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे वाड्यावस्त्यावरील नवीन रस्ते गावातील पाणी व शेतीविषयक शाळांचे असे प्रश्न प्रलंबित असून अडीअडचणी सोडवण्यासाठी थोर मोठ्यांचे आशीर्वाद घेत आहेत.
त्यामुळे लक्ष्मी दहिवडी गटामध्ये कोमल ताई ढोबळे यांच्या प्रचाराची धुरा आता सर्वसामान्य जनतेने हातात घेतल्यामुळे त्यांचे एकंदरीत पारडे विजयाकडे झुकल्याचे दिसू लागले आहे?
पदस्पर्शाने पावन झालेले नगरीत गेली अनेक वर्षे दहिवडी गट हा विकासा पासून वंचित राहिला विरोधकांनी स्थानिक उमेदवार न देता आयात उमेदवार उभा केल्यामुळे मतदारांनी कोमल ताई ढोबळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील्यामुळे विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे?