मोठी बातमी!भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

सरसत्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात कोट्यवधी देशवासीयांच्या मनाला चटका देणारी बातमी समोर आली आहे. भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन झालं आहे. मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या अखेरचा श्वास घेतला.
त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वसनास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी एम्स रुग्णालयात दिग्गज डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले. यावेळी मनमोहन सिंह यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली. डॉक्टरांनी लगेच मनमोहन सिंह यांच्यावर उपचार सुरु केले.
त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं. पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती तेव्हाच समोर आली होती. यानंतर काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार प्रियंका गांधी या एम्स रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली. यानंतर आता मनमोहन सिंह यांचं निधन झाल्याची दुर्देवी बातमी समोर आली आहे.
मनमोहन सिंह यांनी 2004 ते 2014 या काळात काँग्रेस नेतृत्वातील यूपीए सरकारमध्ये पंतप्रधान म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. तसेच 1991 ते 1996 या काळात पी. वी. नरसिंहराव यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मनमोहन सिंह अर्थमंत्री होते.
विशेष म्हणजे मनमोहन सिंह यांनी 1991 मध्ये उदारीकरणाच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे देशाची मोठी आर्थिक वृद्धी झाली. या निर्णयाने भारतात परतीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आली.
मनमोहन सिंह यांच्या कारकीर्दीने देशाला खूप चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. त्यामुळे भारतीय राजकारणात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं.




