“दुहेरी नुकसान !मंगळवेढ्यात वादळी वाऱ्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका वीज पडून कडबा जळून खाक

मंगळवेढा तालुक्यासह गेली चार दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या गडगडाटात अवकाळी पाऊस पडत आहे. याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे.
रविवारी सायंकाळी 6 वाजता अचानक सुरू झालेल्या मंगळवेढा तालुक्यात व शहरात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पाऊसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर 5000 कडब्याच्या बनीम वरती वीज पडून बनीम जळून खाक झाली आहे. मंगळवेढा शिवारातील आवताडे वस्ती येथे अवकाळी पावसात अचानक कडबा बनीमवरती वीज पडून बनीम जळून खाक.
मंगळवेढा शिवारात आवताडे वस्ती येथे नामदेव वसंत आवताडे यांची 5000 पेंड्यांची कडब्याची बनीम आकाशातून वीज पडून जागेवर जळून खाक झाली.निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्याची प्रचंड आर्थिक हानी झाली आहे. शासनाकडून तात्काळ पंचनामा होऊन सदर शेतकऱ्यास तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. गेल्या चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे पिकांना मोठा फटका बसत आहे. पिके जमीनदोस्त होत आहेत.
आज झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.वादळी वाऱ्याने पाठखळ मंगळवेढा रोडवर झाड पडले असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.




