Uncategorized

सोलापूर ! या परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी ,अप्पर जिल्हा दंडाधिकारी अभिजीत पाटील यांनी कलम १६३ अन्वये आदेश दिले!कलम १६३ अन्वये आदेश दिले!

या परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी ,अप्पर जिल्हा दंडाधिकारी अभिजीत पाटील यांनी कलम १६३ अन्वये आदेश दिले!

चैत्रवारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर दि. २५ मार्च ते दि. २ एप्रिल कालावधीत ड्रोन उडविण्यास कलम १६३ अन्वये बंदी घालण्याचा आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी अभिजीत पाटील यांनी जारी केला आहे.

यात्रा कालावधीत लाखो वारकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यात्रेच्या दरम्यान संभाव्य दहशतवादी धोका व ड्रोनद्वारे घातपात होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने ही खबरदारीची उपाययोजना केली आहे. यानुसार श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पंढरपूर व श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट या प्रमुख धार्मिक स्थळांवर तसेच जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी ड्रोन उडविण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

तसेच, जिल्ह्यातील सर्व ड्रोन परवाना धारक व चालकांनी त्यांच्या ड्रोनची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच हा आदेश दि. २५ मार्चपासून पुढील ६० दिवस सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) व सर्व नगरपालिका हद्दीत लागू राहणार आहे. असे अप्पर जिल्हादंडाधिकारी अभिजीत पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

चैत्र वारी; पंढरीत १६३ कलम लागू

श्री क्षेत्र पंढरपूर येथे दि. २५ मार्च ते दि. २ एप्रिल या कालावधीत चैत्रवारी यात्रा संपन्न होणार आहे. यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने वारकरी व भाविक पंढरपूर येथे दाखल होत असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १६३ कलम लागू करण्यात येत आहे.

असे अप्पर जिल्हादंडाधिकारी अभिजीत पाटील यांनी कळविले आहे. या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व घरमालक, प्रॉपर्टी डिलर, ब्रोकर, एजंट, जुने वाहन खरेदी-विक्री करणारे तसेच भाड्याने वाहन देणारे व्यक्ती व संस्था आणि धार्मिक स्थळांचे विश्वस्त यांना अनोळखी व्यक्तींविषयीची संपूर्ण माहिती संबंधित पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नवीन भाडेकरू राहण्यासाठी येत असल्यास किंवा कोणतीही अनोळखी व्यक्ती वाहन खरेदी व भाड्याने घेण्यासाठी संपर्क करत असल्यास त्यांची माहिती त्वरित पोलीसांना न दिल्यास त्यावर कारवाई केली जाईल. तसेच पोलीसांना माहिती न देता अशा व्यक्तींना राहण्याची जागा किंवा वाहन उपलब्ध करून देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

हा आदेश २५ मार्च पासून पुढील ६० दिवसांसाठी सोलापूर ग्रामीण हद्दीत (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) लागू राहणार आहे. असे अप्पर जिल्हादंडाधिकारी अभिजीत पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button