मंगळवेढा लमान तांडा विकासाला एक कोटी मंजूर-आ आवताडे
तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत निधी मंजूर

मंगळवेढा लमान तांडा विकासाला एक कोटी मंजूर-आ आवताडे
तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत निधी मंजूर
मंगळवेढा : वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील लामाणतांडा या वस्तीच्या सुधारण्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर झाले असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी बोलताना आ. अवताडे म्हणाले की मंगळवेढा तालुक्यातील तांडा वस्ती सुधार योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पालकमंत्री जयकुमार गोरे
यांचे कडे पाठपुरावा केला होता त्यानुसार त्यांनी तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधी मंजूर केला असून लवकरच येथील कामे सुरू करण्यात येणार असल्याचे आमदार अवताडे यांनी सांगितले.
या सुधार योजनेअंतर्गत लामाण तांडा येथे पाझर तलाव ते चडचण हायवे पर्यंत रस्ता खडीकरण करणे 20 लाख,फुलसिंग राठोड ते पोमा पवार वस्ती पर्यत काँक्रिटीकरण करणे 20 लाख , लमाणतांडा ते बनतांडा पर्यत रस्ता खडीकरण करणे 20 लाख,
बनतांडा ते मरवडे पर्यत रस्ता डांबरीकरण करणे 20 लाख,राठोड ते पवार वस्ती पर्यंत पेव्हर ब्लॉक, काँक्रिटीकरण, पाणीपूरवठा व पथदिवे बसविणे 20 लाख करणे. अशी मिळून एक कोटी रुपयांची कामे करण्यात येणार असल्याचे आ आवताडे यांनी सांगितले.



