Uncategorized

खळबळ ! मंगळवेढा पंचायत समिती मग्रारोहयो विभागातील कनिष्ठ सहाय्यक कर्मचारी निलंबित

कारवाईमुळे पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांना बसली चपराक

खळबळ ! मंगळवेढा पंचायत समिती मग्रारोहयो विभागातील कनिष्ठ सहाय्यक कर्मचारी निलंबित

कारवाईमुळे पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांना बसली चपराक

मंगळवेढा प्रतिनिधी

मंगळवेढा पंचायत समिती मधील मग्रारोहयो विभागात कार्यरत असलेले कनिष्ठ सहाय्यकाने संपूर्ण कामकाजावर नियंत्रण ठेवणे व वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त सुचनेनुसार कामकाज करणे अपेक्षित असताना वेळेत कामकाज पार न पाडल्याने गटविकास अधिकारी डॉ. जस्मिन शेख यांनी त्यांना निलंबीत केले आहे.

मंगळवेढा पंचायत समिती मध्ये सदर कनिष्ठ सहाय्यकाकडे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा पदभार असून त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त सुचनेनुसार कामकाज करणे तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत केलेल्या कामाचे लाभार्थ्याकडून प्राप्त होणारी देयके नियमानुसार विहित कालावधीत अदा करणे अपेक्षित होते.

मात्र ते न केल्याने दि. १८/२/२०२६ रोजी कामकाजाच्या त्रुटी बाबत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मनरेगा विभागाच्या प्रलंबीत विषयाबाबत लाभार्थी व नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत असल्याने दि. २४ फेब्रुवारी रोजी दप्तर तपासाणी मध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या.

याला जबाबदार धरुन सदर कनिष्ठ सहाय्यकयांचा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवून तद्नंतर गटविकास अधिकारी यांनी त्यांच्यावर विविध कार्यालयीन कामकाजाच्या त्रुटीचा ठपका ठेवून त्यांना निलंबन आदेश काढला आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांना कामचुकार मोठी चपराक बसली असून निलंबनामुळे खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button