Uncategorized

मंगळवेढ्यात १८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या;तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात १८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या;तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मंगळवेढा प्रतिनिधी

मंगळवेढा भांडण सोडवण्यासाठी आणि आपल्या अपंग भावाची बाजू घेण्यासाठी गेलेल्या एका १८ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यातील बाजीनगर लमाण तांडा येथे घडली आहे.

 

सुजित सुभाष राठोड (वय १८) असे या मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शशिकांत पवार आणि आशिष पवार हे दोन आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सुजित राठोड याचा भाऊ रणजित हा दिव्यांग (अपंग) आहे. सोमवारी (दि. २०) संशयित आरोपी शशिकांत पवार हा रणजितची चेष्टा-मस्करी करत होता. यातूनच त्यांच्यात वाद झाला आणि शशिकांतने रणजितला मारहाण करण्यास सुरुवात केली.आपल्या भावाला मारहाण होत असल्याचे पाहून सुजित तिथे पोहोचला आणि त्याने आरोपींना जाब विचारला.याचा राग धरून शशिकांत पवार, आशिष पवार आणि सागर राठोड या तिघांनी सुजितला लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत सुजितच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच बेशुद्ध पडला होता.

 

जखमी सुजितला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती खालावत गेली आणि बुधवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ऐन उमेदीच्या वयात सुजितचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.या घटनेनंतर सुजितचे वडील सुभाष राठोड यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून:

सागर राठोड याला पोलिसांनी अटक केली आहे.दरम्यान, सुजितचे पार्थिव नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात आणले होते.उर्वरित आरोपींना लवकरच अटक  करण्यात येईल असे लेखी दिल्यानंतर पार्थिव बालाजीनगर येथे नेण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button