पंढरपूरमंगळवेढासामाजिक

“नावलौकीक!”टॅलेंट सर्च परीक्षेत कु.सारंगी ब्रम्हानंद कदम ची बाजी;आजपर्यंत दिलेल्या सर्व परिक्षेत चढता आलेख

पंढरपूर टॅलेंट सर्च परीक्षा प्रज्ञाशोध परिक्षा 2024 करकंब येथे घेण्यात आलेल्या परिक्षेचा नुकताच निकाल जाहिर झाला यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलींची करकंब नं.२ मधील कुमारी सारंगी ब्रम्हानंद कदम हिने २०० पैकी १३६ गुण मिळवून ६ वा क्रमांक पटकावला आहे.तिच्या या यशाबद्दल आई वडील आजी आजोबा व शाळेतील वर्गशिक्षक व मुख्याध्यापकांनी मोठे कौतुक केले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड व रूची निर्माण व्हावी, यासाठी दै.’पंढरी भूषण वतीने  परिक्षा घेण्यात आल्या होत्या यामध्ये अनेक विद्यार्धी परिक्षेस बसले होते.त्यामध्ये सारंगी कदम हिने ६ वा येण्याचा क्रमांक पटकावला आहे.

सारंगी कदम हिने या आगोदर दिलेल्या परिक्षेत MTS २०० पैकी १५० गुण मिळवून केंद्रात ४ थी क्रमांक पटकावला,ATS परिक्षेत २०० पैकी १८८ गुण मिळवून राज्यात सातवी,I Am Winner २०० पैकी १९६ गुण मिळवून राज्यात 3 री तर मंथन परिक्षेत १५० पैकी १४०राज्यात ६ वी , बुद्धीवंत परिक्षेत १५० पैकी १४६ गुण मिळवून राज्यात ६ वी,PTS १५० पैकी १३६ गुण मिळवत आजपर्यंत झालेल्या परिक्षेत मोठे यश संपादन केले आहे.

करकंब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलींची नं.२ शाळेचे मुख्याध्यापक खंदारे सर ,लेंगरे मॅडम व लेंगरे सर व वर्गशिक्षक यांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button