मंगळवेढा
शेतक-यांनो !पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, डाॅ सुहास सलगर यांनी दिली माहिती

शेतक-यांनो !पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
डाॅ सुहास सलगर यांनी दिली माहिती
संदिप लिगाडे
मंगळवेढा सन 2024 -25 या आर्थिक वर्षासाठी शेतकरी व शेतमजूर पशुपालकांसाठी सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत मंगळवेढा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना सुरू असून मंगळवेढा तालुक्यातील शेतक-यांनी या योजनांचा लाभ घ्यावा अशी माहिती मंगळवेढा पंचायत समिती पशुधन विकास विस्तार अधिकारी डाॅ सुहास सलगर यांनी केले.
७५ टक्के अनुदानावर ४ शेळ्या व १ बोकड, ५० टक्के अनुदानावर मिल्किंग मशीन, ५० टक्के अनुदानावर मुरघास निर्मितीस प्रोत्साहन अंतर्गत मुरघास (सायलेज) बैंग, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर सायलेज बॅग, खनिज मिश्रण वापरासाठी कमाल २ दुधाळ पशुधनासाठी ३३ टक्के अनुदान अशा योजनांसाठी शेतकरी व शेतमजुरांना अर्ज करता येणार आहेत.
यासाठी पात्र लाभार्थींनी 22 ऑक्टोबर पर्यंत अर्ज मागविण्यात येणार आहेत यासाठी पंचायत समिती मधील पशुधन विकास अधिकारी विस्तार सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये अर्ज व माहितीपत्रक उपलब्ध आहेत.
पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन अनेक लोकांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे.शेतीसोबत जोड व्यवसाय म्हणून ते शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असतात. या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने योजना कृषिपूरक योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून वेळेत शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करण्याचे आवाहन डाॅ. सलगर यांनी केले आहे.




