मोठा उपक्रम! मंगळवेढ्यात राज ठाकरे यांच्या जीवनावरील ‘एक नंबर’ चित्रपटाचा शो मोफत, प्रेक्षकांना तिकीट या ठिकाणी मिळणार

मंगळवेढा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जीवनावर प्रेरित असलेला मराठी चित्रपट एक नंबर दिनांक 11 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात येत आहे. तरी मंगळवेढा येथे या चित्रपटाचा शो रंगप्रभा टॉकीज मंगळवेढा दामाजी चौक येथे प्रदर्शित होणार आहे.
तरी या चित्रपटाच्या पहिल्या शोचे उद्घाटन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्यावतीने दामाजी चौकात दामाजी पंतांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वाजत गाजत सिनेमागृहाच्या थेटर पर्यंत पदाधिकाऱ्यांसोबत जाणार आहेत.
यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा समन्वयक नारायण गोवे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पवार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना साडे अकरा वाजता दामाजी चौकामध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचबरोबर प्रेक्षक यांनी दामाजी चौकामध्ये हजर राहावे असे आवाहन केले आहे.
चित्रपटाचे तिकीट महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यालय किल्ला भाग येथून उपलब्ध होणार आहेत. चित्रपटाचे तिकीट मोफत दिले जाणार आहे.




