“भगीरथ भालकेंच्या जनसंवाद यात्रेची पंढरपूर – मंगळवेढ्यात दमदार एंट्री

“भगीरथ भालकेंच्या जनसंवाद यात्रेची पंढरपूर – मंगळवेढ्यात दमदार एंट्री
संदिप लिगाडे
विधानसभेची जसजशी चाहूल लागली आहे तसतसे इच्छुक उमेदवारांनी आपापले काम चालू केले आहे.पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार स्व. भारतनाना भालके यांच्या आशीर्वादाने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची माजी चेअरमन, पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे उमेदवार भगीरथ भालके यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात प्रत्येक गावात जनसंवाद यात्रा चालू केली आहे.
विद्यमान आमदारांनी माझ्यावर नॉटरीचेबल होतो अशी टीका केली आहे. सोशल मीडियावर जाऊन पाहा मी व माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील प्रत्येक सुख दुःखात सामील झाली आहे. तुम्ही कुणाच्या सुखदुःखात सामील झाला आहात का हे दाखवून द्या? या जलसंवाद यात्रेच्या माध्यम ातून ८० हून अधिक गावात जाऊन आमदार भारत नाना यांनी जोडलेली २००९ पूर्वीची जीवाभावाचे सहकारी, वृद्ध तरुण, कार्यकर्ते पदाधिकारी माता भगिनींचा आशीर्वाद घेतला आहे या जनसंवाद यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्यामुळे विद्यमान आमदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
६००० कोटीची कामे केली असल्याचे सांगत असून ते जनतेची दिशाभूल करत आहेत तुम्ही आज जर मंगळवेढा तालुक्यातील गावात गेला तर जाण्यासाठी नीट रस्ते सुद्धा नाहीत पिण्याच्या पाण्याची दुरावस्था आहे. ६००० कोटीचा त्यांनी हिशोब द्यावा आणि नानांनी केलेल्या कामाचा हिशोब मीही कागदपत्र देतो असा ठाम विश्वास यावेळी भगीरथ भालके यांनी सिद्धेवाडी येथे बोलताना व्यक्त केला.
मंगळवेढा तालुक्यात ही जनसंवाद यात्रा संपल्यानंतर आज पंढरपूर तालुक्यात येणाऱ्या सिद्धेवाडी या गावात जनसंवाद यात्रेचे आगमन झाले. कार्यकर्त्यांनी भगीरथ भालके यांच्या स्वागतासाठी कालपासूनच भला मोठा हार बनवण्यास सुरुवात केली होती. हा हार इतका मोठा होता की हार घालण्यासाठी चक्क क्रेन लावण्यात आले होते. तर भगीरथ भालके यांची पंढरपूर तालुक्यात एंट्री होताच व सिद्धेवाडी नगरीत येताच त्यांच्यावर जेसीबीच्या साह्याने फुल पाखळी उधळून स्वागत करण्यात आले यासाठी सुमारे चार जेसीबी सांगण्यात आले होते. शंभर गाड्यांचा ताफा सिद्धेवाडी नगरीत येताच भगीरथ भालके यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
स्वागत आहे हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता. पंढरपूर तालुक्यात आगम न होताच पंढरपूर मंगळवेढा मार्ग अगदी ट्रॅफिक जाम झाला होता. चार चाकी गाड्या बरोबर मोटरसायकल गाड्यांची रांग रस्त्यावर लागली होती. मंगळवेढा तालुक्यात जनसंवाद यात्रेला मोठा, उदंड प्रतिसाद मिळाला असून ही यात्रा आता पंढरपूर तालुक्यात आली आहे. पंढरपूर तालुक्यात पहिल्यांदाच सिद्धेवाडी येथे मोठ्या जल्लोषात स्वागत झाल्यामुळे यंदा पंढरपूर तालुक्यातील सुद्धा भालके पॅटर्न चालवणार असल्याचे कार्यकर्त्यातून बोलले जात आहे. ही जनसंवाद यात्रा सर्वसामान्य पर्यंत पोहोचले असून भगीरथ भालके सुद्धा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांचा आशीर्वाद घेतला आहे. या जनसंवाद यात्रेचा भगीरथ भालके यांना नक्कीच फायदा होणार आहे असे चित्र स्पष्ट होत आहे. कोणतेही पक्षाच्या तिकिटाचा विचार न करता भारत नाना म्हटल्याप्रमाणे जनता हाच माझा पक्ष हे समजून भगीरथ भालके यांनी आपला जनसंवाद यात्रा पूर्ण करत आणला आहे. जनसंवाद यात्रा मुक्कामी होती.
मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावात त्यांचा मुक्काम झाला आहे. पंढरपूर तालुक्यातील गावात सुद्धा त्यांचा मुक्काम होणार आहे. त्यामुळे झालेल्या या जनसंवाद यात्रेचा भगीरथ भालके यांना विधानसभा निवडणुकीत चांगलाच फायदा होणार हे दिसत आहे.




