“क्षणभर विश्रांती !शरद पवार पुन्हा मैदानात,22 दिवसात तब्बल 52 सभा घेतल्या,तीन दिवसांचे कार्यक्रम जाहीर

आ रोहित पवार यांनी शरद पवार यांचे तीन कार्यक्रम जाहीर केले आहेत. शरद पवार 8 मे ला अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांची श्रीगोंदा येथे सभा होणार आहे. तसेच त्यांनी याच दिवशी शिरुर येथेही सभा होणार आहे.
यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता अहमदनगर येथे सभा होणार आहे.शरद पवार यांना डॉक्टरांनी विश्रांती करण्याची सूचना दिली असताना ते घरुन कुटुंबियांकडून सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहेत. नातू आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन महत्त्वाची माहिती दिली आहे.
“ज्यांनी कॅन्सरलाही पराभूत केलं, भाजपसारख्या महाशक्तीलाही पाणी पाजलं, सत्तेच्या दबावाला सत्याच्या ताकदीवर झुकवलं तो आहे महाराष्ट्राचा सह्याद्री.
अजिंक्य योद्धा आदरणीय शरद पवार अनेकजण एकाच मतदारसंघात अडकून पडले. पण या योद्ध्याने गेल्या 22 दिवसात तब्बल 52 सभा घेऊन भाजप सरकारविरोधात रान उठवलं. आणि कालपासून तब्येत बरी नसताना आणि डॉक्टरांनी दौऱ्याला विरोध केला असतानाही हा योद्धा केवळ 1 दिवसाची क्षणभर विश्रांती घेऊन पुन्हा मैदानात निघालाय.
हाती विचारांचं हत्यार घेऊन… म्हणतात ना… योद्धा कधी जखमांच्या वेदना उगाळत बसत नाही. काही लोकांनी हाती वस्तरा घेऊन मिशा काढण्यासाठी तयार रहावं” असं रोहित पवार म्हणाले.




