सामाजिक

“मोठी बातमी ! शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ, आजचे सर्व कार्यक्रम रद्द

 

बारामती शरद पवार यांनी लेक सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीत सभांचा धडाका लावला होता. लेकीच्या प्रचारासाठी शेवटच्या दिवशीही शरद पवारांनी स्वत:ला झोकून दिलं. रणरणतं ऊन अन् शरीरात थकवा देखील दिसून येत होता. तर शरद पवारांचा आजच्या सभेत आवाजही बसल्याचं पहायला मिळालं होतं.

अशातच आता शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शरद पवारांनी उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द देखील केले आहेत. उद्या शरद पवारांचा मुक्काम गोविंदबागेत असणार आहे.

प्रचाराच्या ताणामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून, खबरदारीसाठी त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय. दरम्यान बारामतीच्या सांगता सभेतही त्यांना बोलताना त्रास जाणवला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button