Uncategorized
मोठी बातमी! भोसे गटात चेअरमन अनिल सावंत गटाचा बसवराज पाटील यांना पाठिंबा,ताकद वाढली!
"बसवराज पाटील विजयी होणार?

मोठी बातमी! भोसे गटात चेअरमन अनिल सावंत गटाचा बसवराज पाटील यांना पाठिंबा,ताकद वाढली!
“बसवराज पाटील विजयी होणार?
मंगळवेढा प्रतिनिधी
भोसे जिल्हा परिषद गटाची निवडणूक अटीतटीची होत असून शेवटच्या टप्प्यात नाट्यमय घडामोडी होताना दिसत आहेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार संत दामाजी साखर कारखान्याचे संचालक बसवराज पाटील यांना आज लवंगी शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांनी जाहीर पाठिंबा दिल्यामुळे त्यांची आता भोसे गटात ताकद वाढली आहे.
लवंगी शुगर येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मतदार संघातील गटाचा विकास करणारा उमेदवार म्हणून बसवराज पाटील यांना पाठिंबा देऊन मताधिक्य मिळवून देऊन विजय करण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी अनिल सावंत यांनी तालुक्यात शेतकऱ्यांच्या विकासासाठी सर्व सामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून सर्वांनी एकत्र येऊन बसवराज पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
या आवाहनाला उपस्थित त्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करून आनंद व्यक्त केला बसवराज पाटील यांना अनिल सावंत यांनी पाठिंबा दिल्यामुळे बसवराज पाटील व समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या निवडणुकीत अटीतटीची लढत होत असताना विजयाचे पारडे इकडे झुकत असताना या पाठिंब्यामुळे आता अधिक महत्त्व निर्माण झाले आहे.असे मत राजकीय निरीक्षकातून व्यक्त केले जात आहे.
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भगीरथ भालके चेअरमन अनिल सावंत यांनी भोसे गटात विजयाचा मार्ग सुखकर झाला केला असल्याचे बोलले जात आहे.





