मंगळवेढा

काळाचा घाला !सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघात, ज्योत आणायला गेलेले दोन भावीक जागीच ठार ,सहा जखमी

काळाचा घाला !सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघात, ज्योत आणायला गेलेले दोन भावीक जागीच ठार ,सहा जखमी

मंगळवेढा प्रतिनिधी

तुळजापूरहून गोणेवाडी (ता. मंगळवेढा ) येथे ज्योत घेवून जाणारी चारचाकी पिकअप ही सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावरील कामती येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. यात दोघे ठार झाले असून सहाजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही घटनास्थळी कामती पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित राहून जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

या अपघातात प्रदीप क्षीरसागर (वय २८ वर्ष), नेताजी कराळे (वय ३० वर्ष) दोघे रा. गोणेवाडी ता. मंगळवेढा अशी मयत दोघांची नावे आहेत. महेश बंडगर (वर्ष १७), वैभव हजारे (वर्ष २४), सोहेल मुलानी (वर्ष २५), समाधान मासाळ (वर्ष ३०), रोहित कसबे (वर्ष २०), रोहित चव्हाण (वर्ष १२ सर्वजण रा. गोणेवाडी ता.मंगळवेढा) हे जखमी झाले आहेत.अपघाताचे वृत्त समजतात गोणेवाडी ग्रामस्थांनी सध्या सोलापूरकडे धाव घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button