राजकारणसांगोला

चर्चेला उधाण!आमदार शहाजी बापू पाटलांची जीभ वळली भर सभेत म्हणाले मोहिते पाटलांना मतदान करण्याचं आवाहन

आ शहाजी बापू पाटलांनी सांगोलेकरांना रणजितसिंह नाईक निंबाळकरांऐवजी रणजीतसिंह मोहिते पाटलांना मतदान करण्याचं आवाहन केलं. चूक लक्षात येताच त्यांनी ती दुरुस्तही केली.

सांगोल्यामध्ये रविवारी महायुतीची जोरदार प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती, यासभेत सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. मात्र, त्यांनी जोशाच्या भरात त्यांनी रणजीतसिंह मोहिते पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन केलं.

शेजारी उभ्या असलेल्या कार्यकर्त्याने ही चूक निदर्शनास आणून दिल्यावर शहाजी पाटलांनी चूक सुधारत महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मतदान करण्याचं आवाहन केलं.

आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडून रणजीतसिंह मोहिते पाटलांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आलं. पण, चूक लक्षात येताच शहाजी बापू पाटलांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मतदान करण्याचं नागरिकांना आवाहन केलं. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button