Uncategorized
मंगळवेढ्यात आज समविचारी आघाडीची बैठक;आगामी निवडणुकीबाबत नवीन दिशा देणारी ठरणार

मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील राजकीय समीकरणे नव्या घडामोडींकडे वळत असताना आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुका समविचारी आघाडी सक्रिय झाली आहे.
या पार्श्वभूमीवर आघाडीची विचार-विनिमय बैठक आयोजित केली असून, ही बैठक मंगळवार, २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता रजपूत मंगल कार्यालय, पंढरपूर रोड, मंगळवेढा येथे पार पडणार आहे.
बैठकीत शहर व ग्रामीण भागातील समविचारी आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेते उपस्थित राहणार असून, या बैठकीमुळे आघाडीच्या भावी वाटचालीचा दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.दरम्यान, स्थानिक राजकीय वर्तुळात या बैठकीबाबत मोठी उत्सुकता असून, ही बैठक मंगळवेढ्यातील आगामी निवडणुकीच्या समीकरणांना नवीन दिशा देणारी ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे.
बैठकीचे निमंत्रक म्हणून शहर व ग्रामीण मंगळवेढा समविचारी आघाडी, मंगळवेढा यांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.



