Uncategorized

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ! दामाजी कारखाना व आर.सी. एफ यांचे वतीने मोफत माती परिक्षण कार्यशाळेचे आयोजन -चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली माहिती 

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ! दामाजी कारखाना व आर.सी. एफ यांचे वतीने मोफत माती परिक्षण कार्यशाळेचे आयोजन

चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली माहिती 

मंगळवेढा प्रतिनिधी 

मा. मुख्यमंत्री यांचे आवाहनास अनुसरुन मा. साखर आयुक्त यांचेकडून मान्य करण्यात आलेला १०० दिवसांचा कृती आराखडा अंमलबजावणी करणेसाठी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि., मंगळवेढा व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (भारत सरकार) यांचे संयुक्त विद्यमाने कारखान्याचे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचे सोईसाठी मोफत मातीपरीक्षण प्रयोगशाळेचे आयोजन करण्यात आले असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री. शिवानंद पाटील यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले कि, ऊस विकास कार्यक्रमाअंतर्गत सदरची प्रयोगशाळा दि. १६/४/२०२५ ते दि. २३/४/२०२५५ या कालावधीत कारखान्याचे कार्यक्षेत्रातील गावामध्ये केंद्रनिहाय आयोजित करणेत येत आहे.

मातीचे परिक्षण केलेने शेतकऱ्यांना आपले शेतात कोणत्या घटकांची कमतरता आहे हे पाहुन खते देणे, पिक घेणे सोईचे होणार आहे. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपले शेतातील चारी कोपऱ्यातुन व शेताचे मध्य भागातील सहा इंच खालील माती लोखंडी हत्यारे न वापरता काढुन एकत्रित करुन अंदाजे एक किलो माती प्लॅस्टीक पिशवीमध्ये भरुन त्यामध्ये एका कागदावर स्वतःचे नांव, गांव, गट नंबर, मोबाईल नंबर इत्यादी लिहून ठरवुन दिलेल्या केंद्राचे ठिकाणी समक्ष भेट्न वेळेत पोहोच करणेची दक्षता घ्यावी. सदरच्या मातीचे मोफत परिक्षण करुन कारखान्याचे कर्मचाऱ्यांमार्फत रिपोर्ट घरपोहोच देणेची व्यवस्था कारखान्यामार्फत करण्यात येईल.

कारखान्याचे शेती विभागाचे कर्मचाऱ्यामार्फत माती परिक्षणाचे महत्व पटवुन देवुन सभासद शेतकऱ्यांना मातीपरीक्षण करुन घेणेबाबत प्रोत्साहन देणेबाबत सुचना दिलेल्या आहेत. तरी कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांनी या प्रयोगशाळेत सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

माती परिक्षण प्रयोग शाळेसाठी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, सोलापुर चे मार्केटिंग मॅनेजर श्री. कैलास घोलप व मार्केटिंग ऑफीसर सागर कांबळे हे उपस्थित राहुन माहिती देणार आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रयोगशाळेचा लाभ घेवुन आपले शेतातील मातीचे परिक्षण करुन घ्यावे असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. तानाजीभाऊ खरात यांनी केले आहे.

कार्यक्षेत्रात खालीलप्रमाणे माती परिक्षण प्रयोगशाळा केंद्रनिहाय आयोजित केली असलेचे कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी सांगीतले.

सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणूकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, सोलापुर चे मार्केटिंग मॅनेजर श्री. कैलास घोलपसाहेब व मार्केटिंग ऑफीसर श्री. सागर कांबळे, बेगमपुर येथील आर.सी.एफ. चे अधिकृत डिलर मे. सुरजमुखी अॅग्रो सेल्स प्रोप्रा. पोपटराव पडवळे हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button