Uncategorized

“तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार आमचा कार्यकर्ताच 

तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार आमचा कार्यकर्ताच

सर्वांना प्रचंड मतांनी विजयी करा – नगराध्यक्षा प्रणिती ताई भालके

मंगळवेढा प्रतिनिधी

“स्वर्गीय आमदार भारत नानांनी तालुक्यात काम करत असताना प्रत्येक व्यक्ती हा कार्यकर्ताच समजून प्रत्येकांना मदतीचा हात दिला समोरचा असो विरोधातील,तीर्थक्षेत्र विकास आघाडी मधील प्रत्येक उमेदवार हा आमचा कार्यकर्ताच असून जाईल तिथे हात जोडून एक मत मागत असून लक्ष्मी दहिवडी गटातील व गणातील उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी लक्ष्मी दहिवडी येथील प्रचार सांगता सभे प्रसंगी व्यक्त केले.

सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना आदरांजली वाहिली.

पुढे बोलताना भालके म्हणाल्या विरोधकांनी प्रत्येक गोष्टीत दबाव आणून मतदान करण्याचा प्रयत्न केला स्व.भारत नानांनी कामं केली असून त्या विकासाच्या जोरावरच मते मागत आहोत सभा मंडपासाठी आलेला निधी आमदारांनी माघारी नेला घरकुल विहीर वाळू मूलभूत योजना धुळखात पडल्या लोकप्रतिनिधींनी आमचे उमेदवार पळवून नेले पार्टी पाडायची काम सुरू केली आजपर्यंत शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाहीत बीजेपी सरकार लोकशाही मोडीत काढून हुकूमशाही आणण्याचे काम करत आहे या भागात नोकर वर्ग भरपूर असून त्यांनाही धमकी देण्याचे काम केले अशा अशा प्रवृत्तींना धडा शिकवायचा असेल तर आघाडी च्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असे भालके यांनी बोलताना सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते माऊली कोंडुभैरी बोलताना म्हणाले पाण्याची चळवळ ढोबळे सरांनी सुरू केली राज्यात शिक्षण गंगा उभी केली पाण्याचा पाठपुरावा स्वर्गीय आमदार भारत नानांनी केला भूमिपुत्र डॉक्टर राम साळे यांनी कॅनलला मान नदीचा दर्जा देऊन या भागाचे नंदनवन केले.

यावेळी उमेदवार कोमल ताई ढोबळे काकासाहेब मोरे माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे नगरसेवक सोमनाथ माळी चेअरमन अनिल दादा सावंत पांडुरंग चौगुले राजाभाऊ मेतकुटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.संभाजी गावकरे सर मुरलीधर दत्तू दिनकर यादव विलास पाटील प्रशांत पाटील महेश स्वामी श्रीकांत सावे गंगाधर मसरे यांच्यासह भागातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button