Uncategorized

मोठी बातमी!मंगळवेढ्यात पंढरपूर मार्गावर एसटी बस व पिकअपचा भीषण अपघात; एकाचा जागेवरच मृत्यू तर सहा शाळकरी विद्यार्थी जखमी!

मंगळवेढ्यात पंढरपूर मार्गावर एसटी बस व पिकअपचा भीषण अपघात; एकाचा जागेवरच मृत्यू तर सहा शाळकरी विद्यार्थी जखमी!

मंगळवेढा प्रतिनिधी

मंगळवेढा शहरापासून पंढरपूर रोडवर देगाव गावाजवळ आज सकाळी एसटी बस आणि पिकअप वाहनांचा समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला असून सहा शाळकरी विद्यार्थी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली.हा अपघात एवढा जोरात झाला असून दोन्ही वाहनांचे पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एसटीतील सहा विद्यार्थ्यां जखमी झाले असून पिकअप वाहन समोरून येणाऱ्या एसटी बसशी समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेनंतर रस्त्यावर काचांचे तुकडे, वाहनांचे सुटे भाग विखुरलेले दिसत होते.स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यास मदत केली.

 या अपघातात पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांना किरकोळ तर काहींना मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्याची प्राथमिक माहिती आहे. एसटी बसमधील प्रवाशांनाही किरकोळ मार लागल्याचे समजते.

अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली तसेच कोणत्या कारणामुळे अपघात झाला याबाबत तपास सुरू आहे.पुढील उपचारासाठी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button