Uncategorized

अपघात! लग्नाला निघालेल्या तरुणाचा वाटेत अपघात , कंटेनर व दुचाकीचा सामोरा समोर अपघातात दोघांचा जागीच मृत्यू मंगळवेढा तालुक्यातील घटना 

अपघात! लग्नाला निघालेल्या तरुणाचा वाटेत अपघात , कंटेनर व दुचाकीचा सामोरा समोर अपघातात दोघांचा जागीच मृत्यू मंगळवेढा तालुक्यातील घटना
मंगळवेढा : पंढरपूर-अथणी राष्ट्रीय महामार्गवरील जत तालुक्यातील शेगाव गावच्या हद्दीत प्राथमिक आरोग्य केंद्रा समोर कंटेनर व दुचाकीचा ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. कामन्ना संगाप्पा हत्तळी (वय २५, मूळ रा. चिक्कलगी) व सचिन गणेश व्हनमाने (वय २१, रा. शेगाव, ता. जत) असे मृत तरुणांची नावे असून आज दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
घटनेनंतर जत पोलिसांनी तात्काळ घतनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह जत ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केले. पोलिसांकडून व घटनास्थळी मिळालेली अधिक माहिती अशी की, कामन्ना हत्ताळी व सचिन व्हनमाने हे दोघेही कंटेनर चालक आहेत. मयत हत्ताळी याच्या चुलत भावाचे शुक्रवारी गावी लग्न असल्याने तो शेगाव येथील पेट्रोल पंपावर माल भरलेला कंटेनर लावला होता. तर हत्ताळी त्याचा मित्र व्हनमाने याला कंटेनर घेऊन चेन्नईला जाण्यास सांगून त्याला शेगावहून पेट्रोल पंपावर सोडण्यासाठी निघाला होता.
दरम्यान, जतहून सांगोल्याच्या दिशेने एक कंटेनर निघाला होता. शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर दोघांचा समोरासमोर अपघात होऊन यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेह जत ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केले. मात्र, रात्री उशिरा पर्यंत जत पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
अधिक तपास जत पोलिस करत आहेत. मयत कामांना हाताळे हा देखील अविवाहित असून त्याने गतवर्षी घराचे बांधकाम केले असून त्याच्या पश्चात आई-वडील विवाहित बहीण व लहान भाऊ असा परिवार आहे. अपघातीने चिक्कलगी गावावर शोककळा पसरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button