मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागातून एक १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली असून याबाबत तिच्या कुटूंबियांनी मंगळवेढा पोलीसात तक्रार दिली आहे. दरम्यान तपासिक अंमलदार तथा महिला पोलीस उपनिरीक्षक डॉ. आरती कनीरे ह्या सदर मुलीचा कसून शोध घेत आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील बेपत्ता तरुणी दि. ११ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजता राहते घरातून कोणास काही न सांगता निघून गेली आहे. कुटूंबियांनी सदर मुलीचा सर्वत्र कसून शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही.
तिचे वर्णन पुढील प्रमाणे उंची पाच फुट, रंग सावळा, अंगात गुलाबी रंगाचा ड्रेस, काळी जीन्स, शिक्षण बारावी पास, कानात सोन्याची झुबे अशा वर्णनाची मुलगी कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी पोलीस उपनिरीक्षक डॉ. आरती कनीरे (९३२५४७८१११) या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.