Uncategorized

“मंगळवेढ्यात भाजपची मुसंडी; आमदार समाधान आवताडे यांची एकहाती सत्ता

विरोधकांचा सुफडा साफ

“मंगळवेढ्यात भाजपची मुसंडी; आमदार समाधान आवताडे यांची एकहाती सत्ता

विरोधकांचा सुफडा साफ

मंगळवेढा प्रतिनिधी

मंगळवेढा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या गटाची एकहाती सत्ता मिळवून मोठे यश संपादन केले आहे.

जिल्हा परिषद गटाच्या चार जागा व पंचायत समिती गणातील सहा जिंकल्या आहेत.विरोधकांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला पंचायत समिती गणाच्या दोन जागेवर समाधान मानावे लागले.

मतमोजणी सुरू झाल्यापासून दामाजी नगर जिल्हा परिषद गटातून रमेश भांजे यांनी भाजपच्या विजयाची सुरुवात केली तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्वच उमेदवार चारही गटात पिछाडीवर राहिले पंचायत समिती गणातून सहा उमेदवारांचा पराभव झाला.

जिल्हा परिषद: ४ पैकी ४ जागा भाजप विजयी भोसे -प्रदीप खांडेकर

लक्ष्मी दहिवडी – करुणा शिवशरण

हुलजंती – संगीता दुधाळ

संत दामाजी नगर – रमेश भांजे,पंचायत समिती: ८ पैकी ६ जागा (भाजप विजयी)

संत चोखामेळा नगर – दीपाली आनंद ताड भाजप बोराळे – जयश्री कवचाळे हुलजंती – अर्जुन मल्लाळे मरवडे – मनीषा श्रीकांत गण पाटील लक्ष्मी दहिवडी – विनायक यादव भोसे – आप्पासाहेब निकम

रड्डे : सुरेश कांबळे (तीर्थक्षेत्र आघाडी)

दामाजी नगर : जयश्री शिंदे (तीर्थक्षेत्र आघाडी)

या निवडणुकीत माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे विठ्ठलचे मा. चेअरमन भगीरथ भालके चेअरमन अनिल दादा सावंत यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button