“लोकप्रिय आमदार अभिजीत पाटील यांची कोमल ताई ढोबळे ,काकासाहेब मोरे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन!
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 निमित्त गटातील व गणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिजीत पाटील यांची जाहीर सभा होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व तीर्थक्षेत्र विकास आघाडी काँग्रेस आई शिवसेना उबाठा व इतर मित्र पक्षाचे लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार कोमल ताई ढोबळे व लक्ष्मी दहिवडी गणाचे उमेदवार काकासाहेब मोरे यांच्या प्रचारार्थ
आंधळगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठीक सकाळी 11 वाजता जाहीर सभेचे आयोजन केले असून परिसरातील गावातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.